मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाची. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि आलियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पाहायला गेलं तर, दोघांच्या कमाईचा आकडा फार मोठा आहे. दोघेही वर्षाला कोट्यवधी रुपये कमावतात. त्यामुळे लग्नानंतर आलिया आणि रणबीर किती कोटींचे मालक होणार असा प्रश्न सध्या सर्वांना पडला असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आज आपण त्यांच्या उत्पन्नाबद्दल जाणून घेवू. रिपोर्टनुसार आलियाची नेट वर्थ जवळपास  158 कोटी रुपये आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी ती  2 कोटी रूपये फी घेत. तर  आलिया एका सिनेमासाठी तब्बल 5 कोटी रूपये मानधन घेते.


वर्षाच्या उत्पन्नाशिवाय तिच्याकडे दोन फ्लॅट आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. शिवाय आलियाचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आलिया आता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 



रिपोर्टनुसार रणबीरच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, रणबीरचं वर्षाचं उत्पन्न 337 कोटी रूपये आहे. रणबीर देखील एका सिनेमासाठी जवळपास 5 कोटी रूपये मानधन घेतो. एवढंच  नाही तर त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.


आलिया आणि रणबीरच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर,  दोघांचं उत्पन्न 495 कोटी रूपये आहे. त्यामुळे लग्नानंतर आलिया आणि रणबीर जवळपास 495 रूपयांचे मालक होतील.