Ranbir Kapoor-Alia Bhatt Menu At Home : सेलिब्रिटी कपल हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यापैकी एक जोडपं जे नेहमीच चर्चेत असतं ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आहे. त्या दोघांचं खाण्यावर किती प्रेम आहे याविषयी सगळ्यांना माहित आहे. पण त्यांच्या घरी रोज काय बनवण्यात येतं आणि ते कशी त्यांची लाइफस्टाईल मेनटेन करतात या विषयी जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर आणि आलिया यांचा पर्सनल शेफ सूर्यांश सिंह कंवरनं काही दिवसांमध्ये दोघांसाठी काही दिवसांपासून सतत काय काय बनवलं याची एक झलक शेअर केली आहे. सूर्यांशनं इन्स्टाग्रामवर आलिया आणि रणबीर कपूरसोबत काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यानं लिहिलं की काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्टसाठी काही मजेशीर डिश बनवल्या! या गोड जोडप्यासाठी काम करत असताना खूप चांगला काळा गेला! (प्रायव्हेट शेफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, बॉलिवूड, होम कुक्ड)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शेफ सूर्यांश सिंह कंवरनं शेअर केलेल्या या व्हिडीओत डोसा, सूप, ऑमलेट, मासे, मांस, कैलामारी आणि पनीरसोबत आणखी बऱ्याच डीश दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये आलियाची मांजर एडवर्ड देखील दिसली. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओवर कमेंट करत चांगलं काम करत आहे शेफ असं म्हटलं आहे. दुसरा नेटकरी म्हणाला की यम्मी, यम, यम. तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, या सगळ्या अप्रतिम डिश आहेत. आणखी एक नेटकरी म्हणाला, या सगळ्या डिश दिसायलाही सुंदर दिसत आहेत आणि त्यासोबत हेल्थसाठी देखील चांगल्या आहेत. या सगळ्याची लिस्ट पाठवा.


दरम्यान, रणबीर कपूर हा सगळ्यात शेवटी संदीप रेड्डी वांगाच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात दिसणार होता. चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी देखील आहेत. त्याशिवाय तो लवकरच 'अ‍ॅनिमल पार्क' मध्ये दिसणार आहे. संजय लीला भन्साळीचा चित्रपट लव्ह अॅन्ड वॉरमध्ये देखील रणबीर दिसणार आहे. या चित्रपटात आलिया आणि विकी कौशल देखील दिसणार आहेत. 


हेही वाचा : बिग बींपेक्षाही श्रीमंत आहे त्यांची नात नव्या! वारसा हक्कानं मिळालीये 'इतकी' संपत्ती


याशिवाय आलियाविषयी बोलायचं झालं तर ती 'जिगरा' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वासन बाला यांच्या या चित्रपटात वेदांग रैना देखील दिसणार आहे. याशिवाय आलिया ही 'अल्फा' चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत शर्वरी वाघ एका सुपर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. 'अल्फा' चे दिग्दर्शन शिव रवैलनं केलं आहे. या चित्रपटात फक्त दोन अभिनेत्री दिसणार आहेत.