Ranbir Kapoor : 'कॉफी विथ करण' हा एक असा शो आहे ज्यात सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणानं बोलताना दिसतात. सध्या या शोचं सध्या 8 वं पर्व सुरु आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी येऊन गेले आहेत. त्या सगळ्यांनी केलेल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यावरून सेलिब्रिटी हे कॉन्ट्रोव्हर्सीत अडकल्याचे आपण पाहिले. इतकं असलं तरी सोशल मीडियावर या कलाकारांचे जुने व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसतात. सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पण त्या व्हिडीओतील अर्जुनसोबतच्या इतर कलाकारांनी केलेल्या कृतीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत अर्जुन कपूरसोबत रणबीर कपूर आणि रणबीर सिंग दिसत आहे. यावेळी हटके गेम खेळत असताना उत्तर देण्यासाठी अर्जुन कपूरला दोन्ही कलाकारांना किस करायचे होते. त्याचाच हा व्हिडीओ आहे. त्यावेळी करण जोहर हा रणबीर कपूर आणि रणवीर सिंगला गेम खेळत असताना प्रश्न विचारतो की त्यांच्यापैकी कोणी मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत शारिरीक संबंध ठेवले आहेत का? त्यावर रणवीरनं काहीही रिअॅक्ट केलं नाही तर रणबीरनं लगेच अर्जुनला किस केलं. रणबीरनं हे कृत्य करताच अर्जुन आश्चर्यचकीत होऊन म्हणाला, 'माझ्या गर्लफ्रेंडसोबत तर नाही ना? यावर रणबीरनं उत्तर दिले, नाही. रणबीर आणि अर्जुनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अर्जुन कपूर नुकताच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये दिसला होता. यावेळी अर्जुन कपूरनं अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यापैकी एक म्हणजे त्याच्या आणि मलायकाच्या लग्नाच्या चर्चांवर देखील तो बोलला आहे. त्याला मलायकासोबतच्या लग्नावर विचारताच अर्जुन म्हणाला होता की 'योग्य वेळ आली की मी मलायकासोबत याविषयी बोलेन.' 


हेही वाचा : 'आपल्याकडे नुसता बेभानपणा...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला


पुढे अर्जुन म्हणाला की 'मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा आम्ही त्याजागी पोहोचू आणि एकत्र याविषयी बोलू. सध्या मी जिथे रिलेशनशिपमध्ये आहे तिथे मी खूप आनंदी आहे. आम्ही कम्फर्टेबल होईपर्यंत खूप स्ट्रगल केलं आहे. सध्या मी याविषयी काहीही बोलू इच्छित नाही, कारण यावर एकट बोलणं योग्य नाही.'