... आणि ढसाढसा रडू लागला Ranbir Kapoor, Video पाहून तुम्हीही व्हाल भावुक
रणबीरला ढसाढसा रडताना पाहून चाहते चिंतेत, अभिनेत्याचा `तो` व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा
मुंबई : 'सावरिया' सिनेमातून अभिनेता रणबीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पण रणबीरच्या अभिनयाची जादू मात्र आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. सध्या रणबीर त्याच्या आगामी सिनेमांबद्दल चर्चेत आहे. दरम्यान रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता ढसाढसा रडताना दिसत आहे. रणबीरला रडताना पाहून त्याचे चाहते देखील चिंतेत आले आहेत. रणबीर का रडत आहे? असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने काही तासांपूर्वी रणबीरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये रणबीर एका जागी प्रचंड रडताना दिसत आहे. पण रणबीरचं रडण्याचा कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
व्हिडीओमध्ये दिग्दर्शक कट बोलतो, पण तरी देखील रणबीरचे अश्रू थांबत नसल्याचं दिसत आहे. रणबीरचा हा व्हिडीओ गुपचूप शूट करण्यात आला आहे. दरम्यान अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. रणबीरच्या व्हिडीओवर अनेकांनी तो का रडतोय असा प्रश्न विचारला आहे.
रणबीरच्या आगामा सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, तो लवकरचं 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहे. सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय अभिनेते अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय देखील सिनेमात झळकणार आहेत.