मुंबई : रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. या दोन सुपरस्टार्सची लव्हस्टोरी ते ब्रेकअपपर्यंतची कथा खूप गाजली आहे. सध्या रणबीर आणि दीपिका दोघंही आपापल्या जोडीदार आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबत त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. दरम्यान, रणबीर दीपिकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या अंतर्गत हे दोघं लवकरच एकत्र दिसणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर-दीपिका पुन्हा एकत्र दिसणार
खरं तर, सूत्रांचा हवाला देत बातमी समोर येत आहे की, ब्रह्मास्त्र फेम अभिनेता रणबीर कपूर आणि बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी एका नवीन प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, हे दोन कलाकार कोणत्याही चित्रपटासाठी नव्हे तर एका टीव्ही जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत. 


या जाहिरातीसाठी दिग्दर्शक पुनित मल्होत्रा ​​रणबीर आणि दीपिका या जोडीला एकत्र आणत आहेत. असं सांगितलं जात आहे की, ही एक कमर्शियल एड बेवरेज ब्रांड एंडोर्समेंट डील आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना रणबीर आणि दीपिका ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे.


या चित्रपटांमध्ये रणबीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे
याआधीही रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण एका टीव्ही जाहिरातीद्वारे एकत्र दिसले आहेत. पण या टीव्ही जाहिरातींपूर्वी रणबीर आणि दीपिकाने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. ये जवानी है दिवानी या चित्रपटात रणबीर दीपिकाची जोडी हिट ठरली होती. अखेर हे दोन्ही सुपरस्टार तमाशा चित्रपटात दिसले. अलीकडे रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्रमध्ये दीपिका पदुकोण देखील कॅमिओ करताना दिसणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत.