Ranbir Kapoor Angry : बॉलिवुडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मग ती ईडीची (ED) नोटीस असो की त्याचा आगामाची चित्रपट. रणबीर शेवटचा 'शमशेरा'मध्ये दिसला होता, तर सध्या तो त्याच्या आगामी अॅक्शन फिल्म 'अ‍ॅनिमल'साठी (Animal) चर्चेत आहे. अशातच आता, रणबीर कपूर त्याच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता पापाराझींवर (paparazzi) भडकलेला दिसत आहे. रणवीरच्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी अ‍ॅनिमल चित्रपटात वेगळ्या अवतारात दिसणार आहे. पण त्याआधी रणबीरचा अँग्री यंग मॅन अवतार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीर कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो पापाराझींवर भडकलेला दिसत आहे. रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.


काय आहे नेमकं प्रकरण?


अभिनेता रणबीरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका इमारतीतून बाहेर पडून कारकडे जाताना दिसत आहे. यादरम्यान पापाराझी वारंवार त्यांना थांबायला आणि पोज देण्यास सांगतात. यावर रणबीर चिडतो आणि म्हणतो- 'क्या करूं भाई.. क्या करूं?' यानंतर, एका चाहत्याला सेल्फी दिल्यानंतर तो त्याच्या कारमधून निघून जातो. यावेळी पापाराझी रणबीरला दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसले, पण त्याने त्यालाही प्रतिसाद दिला नाही.



रणबीरच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने, 'मी एक मिनिट पोझ दिली असती तर काय झालं असतं, इतका अ‍ॅटिट्यूड, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने 'यार, तुम्ही नेहमी तुमच्या समोरच्या व्यक्तीकडे कॅमेरा घेऊन पाहत राहिल्यास कोणालाही चिडचिड होईल,' असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने, 'आरकेने अतिशय गलिच्छ वर्तन केले,' असं म्हटलं आहे. कमेंट करताना आणखी एका व्यक्तीने रणबीरला चिडखोर म्हटलं आहे.


दरम्यान, रणबीर कपूरचा अॅनिमल चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. अनिल कपूर आणि बॉबी देओलही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. चित्रपटाच्या टीझरनुसार अनिल रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.