मुंबई : रणबीर कपूरच्या संजू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३३३ कोटीहून अधिक कमाई केली. संजू सिनेमाच्या छप्परफाड कमाईने रणबीर कपूरच्या करिअरला नवी भरारी मिळाली. इतकंच नाही तर रणबीर कपूरची ब्रॅंड व्हॅल्यू वाढली. रणबीर बोलेल ती किंमत द्यायला कोणीही तयार आहे. 


सलमानलाही टाकले मागे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनुसार, रणबीर कपूर एका जाहिरातीसाठी सुमारे १२ कोटी घेतो. आता ही किंमत दुप्पटीने वाढली आहे. रणबीर कपूरच्या मानधनाने बॉलिवूडचा दबंग खानलाही मागे टाकले आहे. सलमान एका जाहिरातीसाठी सुमारे ८ कोटी रुपये घेतो. 


जाहिरातींसाठी ऑफर्स


संजू प्रदर्शित होण्यापूर्वी रणबीरचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करत नव्हता. पण संजूच्या जबरदस्त कमाईने रणबीरला मोठे यश मिळवून दिले. संजूच्या जबरदस्त यशानंतर रणबीरकडे जाहिरातींची रांग लागली आहे. आपल्या प्रॉडक्टची जाहिरात रणबीरने करावी, असे प्रत्येकाला वाटत आहे. तर रणबीरने कोणत्या जाहिराती स्वीकाराव्या यासाठी त्याची टीम काम करत आहे.


३०० कोटींचा पहिलाच सिनेमा


संजू हा रणबीर कपूरच्या करिअरमधला पहिला ३०० कोटींची सिनेमा बनला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवसापासून अनेक रेकॉर्ड्स तोडले आणि हा पराक्रम अजूनही सुरुच आहे. संजय दत्तचा बायोपिक असलेला संजू सिनेमा राजकुमार हिरानीने दिग्दर्शित केला आहे.