Ranbir Kapoor talked about why once Rishi Kapoor Beat him : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकतीच रणबीरनं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. 30 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. त्यावेळी रणबीरसोबत नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनीनं देखील हजेरी लावली होती. यावेळी त्या तिघांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यापैकी एक किस्सा हा रणबीरनं ऋषि कपूर यांची आठवण करत एक किस्सा सांगितला. कशा प्रकारे त्याला दिवाळीच्या दिवशी ऋषि कपूर यांना मारलं होतं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर लहाणपणा पासून शांत असल्यानं त्याला कधी जास्त ओरडा किंवा मार पडला नाही. पण ऋषि कपूर यांनी फक्त एकदाच रणबीरला मारलं होतं. त्याचा किस्सा सांगत रणबीर कपूर म्हणाला, मला एकदाच खूप जोरात मारलं होतं ते पण दिवाळी पूजेसाठी आरके स्टूडियोजमध्ये होतो तेव्हा. माझ्या वडिलांची देवावर श्रद्धा होती. मला वाटतं की तेव्हा मी आठ-नऊ वर्षांचा असेल तेव्हा मी चप्पल घालून मंदिरात गेलो. तेव्हा त्यांनी मला कानशिलात लगावली आणि ते पण खूप जोरात.  



रणबीरनं पुढे सांगितलं की त्यांना लहाणपणी त्यांच्या चुका सुधरवण्यासाठी आई नीतू कपूर मारायची आणि त्यांनी एकदा तर हॅंगरनं देखील मारलं होतं. त्याशिवाय नीतू कपूर यांना प्रश्न विचारण्यात आला की रणबीरचं लग्न झाल्यानंतर त्याच्यात काय बदल झाले. त्यावर उत्तर देत नीतू कपूर म्हणाल्या की तो आता एक चांगला व्यक्ती झाला आहे, जो नाती जपतो त्यांना महत्त्व देतो. तर रिद्धिमा कपूर साहनी म्हणाली की राहाच्या जन्मानंतर तो एक प्रेमळ आणि काळजी घेणारा वडील आहे. राहाला पाहिल्यानंतर लगेच त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागतो. 


हेही वाचा : सलमान खानच्या गाण्याचं शूटिंग सुरु असतानाच पोलिसांनी सगळ्यांना अटक केली अन्..; अभिनेत्याचं सांगितला 'तो' किस्सा


दरम्यान, लक्षवेधी गोष्ट म्हणजे ऋषि कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक वर्ष कॅन्सरशी झूंज दिली मात्र, 2020 मध्ये त्यांचे लग्न झाले. तर रणबीर आणि आलियानं 2022 मध्ये लग्न केलं. त्याच वर्षी राहाचा जन्म झाला.