मुंबई : एकीकडे अभिनेता रणबीर कपूरला सोशल मीडियापासून दूर राहायचे आहे, तर दुसरीकडे त्याचे चाहते आणि सर्व फॅन पेज त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या रणबीर एकामागून एक अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे तो अनेक प्रोजेक्टसाठी एकत्र काम करत आहे. यातील एका प्रोजेक्टदरम्यान रणबीर कपूरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


अलीकडेच, रणबीरने एका जाहिरातीसाठी फीमेल ट्रांसफॉर्मेशन केलं आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की रणबीर मुख्य भूमिकेसाठी मेकओव्हर करत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एका कलाकाराला परिवर्तनासाठी किती तीव्र मेकअप करावा लागतो हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.


त्याच्या भुवया आणि केस व्यवस्थित करण्यापासून ते परिपूर्ण नखे मिळवण्यापर्यंत, या कृत्रिम प्रवासात अभिनेत्याला पुरुष ते स्त्री बनण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेतून जावे लागते. मात्र, या लूकमध्येही रणबीर चांगला दिसत आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



 व्हिडिओमध्ये, संपूर्ण प्रोसेसमध्ये रणबीर किती संयमाने खुर्चीवर बसलेला दिसतो आहे, कारण त्याला हा लूक देण्यात एक नाही तर अनेक कलाकार गुंतले आहेत. रणबीर शांतपणे बसलेला, चॉकलेट चघळत आहे. आणि एवढा वेळ लागत असल्याने तो फोनवर टाईमपास करताना दिसत आहे.