मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्न झाल्यापासून कामात व्यस्त आहेत. हे दोन्ही कपल त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी सतत शूटिंग करत आहेत. दरम्यान, रणबीर कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फोटोमध्ये रणबीर आलियासोबत नाही तर दुसऱ्या मुलीसोबत रोमान्स करत आहे. अभिनेत्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे ही अभिनेत्री
खरंतर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून श्रद्धा कपूर आहे. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर लव रंजनच्या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. हे शूटिंग सध्या स्पेनमध्ये सुरू आहे. या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर श्रद्धा कपूरसोबत रोमान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या स्क्रीनशॉटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.


चित्रपटाचं नाव काय आहे
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटाचं नाव 'लव्ह रंजन' असं आहे.  या चित्रपटाचं शूटिंग सातत्याने सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये श्रद्धा कपूर रणबीर कपूर एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. बातमीनुसार, रणबीर आणि श्रद्धाचा हा चित्रपट पुढच्या वर्षी होळीला रिलीज होऊ शकतो.



 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट यावर्षी 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्याला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. अशा परिस्थितीत अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी अपेक्षा आहे.