मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या सोशल मीडियावर नेहमीच स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ऐश्वर्याने सोशल मीडियावर काही शेअर करताच अवघ्या काही वेळातच ती पोस्ट व्हायरल होवू लागते. अगदी मोठ्यांपासून लहानग्यांपर्यंत प्रत्येक वर्गात ऐश्वर्याचा चाहता वर्ग आहे. असं क्वचितच कोणी असेल ज्याला ऐश्वर्या माहिती नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका गोष्टीविषयी सांगणार आहोत जी सगळ्यात जास्त चर्चेत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडच्या सगळ्यात सुंदर आणि एट्रॅक्टिव्ह अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्यासोबत स्क्रिन शेअर करण हे अनेक कलाकारांचं स्वप्न असतं. ऐश्वर्याचा प्रत्येक सिनेमा तिच्या चाहत्यांच्या खूप जवळ आहेत. ज्यामध्ये २०१६ साली आलेला रोमँन्टिक ड्रामा 'ऐ दिल है मुश्किल'चा देखील समावेश आहे. करण जोहरच्या दिग्दर्शनात बनलेल्या सिनेमात रणबीर कपूर बॉलिवूडची क्वीन ऐश्वर्यासोबत रोमान्स करताना दिसला होता. 


मिस मालिनी ला दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने ऐश्वर्यासोबत रोमॅन्स करण्यावर भाष्य केलं होतं. त्याने सांगितलं होतं की,  ऐश्वर्यासोबत रोमँन्टिक सीन देण्यासाठी त्याला लाज वाटत होती. रणबीर कपूरने असंही म्हटलं की, मला लाज वाटायची. माझे हात थरथरायचे. कधी-कधी मी तिच्या गालाला हात लावयलाही संकोच करायचो.नंतर त्यानेच सांगितलं की, काय प्रॉब्लेम आहे तुझा? आपण फक्त केवळ एक्टिंग करत आहोत. नीट कर. रणबीर पुढे म्हणाला, नंतर मी विचार केला की, कधी अशी संधी पुन्हा मिळणार नाही. मग मी देखील संधीवर चान्स मारला.


ऐश्वर्यासोबत काम करण्याच्या एक्सपीरियंन्सला रणबीरने आठवणीत राहिलेला क्षण म्हटलं. त्याने असंही म्हटलं की, माझा एक्सपीरियंन्स खूपच भारी होता. कोणता अभिनेत्याला तिच्यासोबत रोमॅन्स करायला आवडणार नाही? जेव्हा करणने मला सांगितलं की, तो या सिनेमात ऐश्वर्याला कास्ट करतोय तो माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण होता. सिनेमात ऐश्वर्या आणि रणबीरने खूप सारे इंटीमेट सीन्स दिले आहेत. दोघांच्या केमेस्ट्रीला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मात्र आपल्यापेक्षा वयाने लहान अभिनेत्यासोबत रोमँन्टिक सीन दिल्यामुळे ऐश्वर्याला खूप ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.