मुंबई : टीव्ही मालिका 'रंग माझा वेगळा' ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यामधील सगळी पात्र प्रेक्षकांच मन जिंकत आहे. विशेष करुन या  मालिकेतील बालकलाकार प्रेक्षकांच्या घरात मन करुन आहेत. एवढच नाही तर टीआरपीच्या बाबतीतही ही मालिका अव्वल आहे. एवढं सगळं सुरळीत सुरु असताना या मालिकेच्या प्रेक्षकांना नाराज करणारी बातमी समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी मालिकांमध्ये सध्या लहान मुलांना महत्त्वाची भूमिका असण्याचा ट्रेंड सुरू आहे.  पण या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली बालकलाकार ही मालिका सोडत असल्याची माहिती समोर येत आहे. या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणारी चिंटुकली साईशा भोईरने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती पहायला मिळत होती. तिने या मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्यामूळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे.


साईशाच्या आई-बाबांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन करत ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. या लाईव्ह सेशनमध्ये बोलताना साईशाचे आई-बाबा म्हणाले, ''साईशाला शाळा खूप आवडते. आणि या वयात तिच्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि तिचीच ही ईच्छा होती. तिची खूप दगदग व्हायची आणि या सगळ्या दगदगीमुळे तिचं ६ किलो वजनही कमी झालं होतं. साईशाला मालिकांआधी ही लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखत होती. लवकरच आम्ही खूप मोठी गुडन्यूजही तुम्हाला देणार आहोत. साईशा अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्येही तुम्हाला दिसणार आहे. मोठ्या पडद्यावरही साईशा तुम्हाला दिसेल. तुमचं प्रेम असच कायम राहूद्या... असं म्हणत साईशाच्या आई-बाबांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


साईशा भोईर सोशल मीडियावरही चर्चेत असते. ती विविध रील्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती या मालिकेत येण्यापूर्वीच सोशल मीडियावर स्टार होती. 'चिंटुकली साईशा' म्हणून ती इस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे.तिला नवा सिनेमा मिळाल्याने ती ही मालिका सोडत असल्याचे समोर आलं असून आता कार्तिकीची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचप्रमाणे साईशा कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवर चाहते मात्र नाराजी व्यक्त करत आहेत.