मुंबई : मेरे रश्के कमर हे गाणं दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हे गाणं अजय देवगनच्या बादशाहो या सिनेमातील हे लोकप्रिय गाणं आहे. 1988 मध्ये नुसरत फतेह अली खान यांनी हे गाणं गायलं आहे. याचे अनेक वर्जन इंटरनेटवर उपलब्ध आहे. मात्र आता क्वीन ऑफ भोजपुरी सिनेमाच्या नावाने फेमस असलेली राणी चॅटर्जी देखील या गाण्यावर व्हिडिओ तयार करत आहे. 


राणीच्या डान्सची होतेय चर्चा 



राणी चॅटर्जीने डान्स केलेला हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. यूट्यूबवर Rani Chatterjee Entertainment द्वारे 1 फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला. हा व्हिडिओ 1 लाखाहून अधिक लोकांनी पसंद केलं आहे. अनेक लोकांनी कमेंट करून राणीचं भरभरून कौतुक केलं आहे.