रानी मुखर्जीच्या `हिचकी` चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...
बॉलिवूडपासून अनेक दिवसांपासून दूर असलेली अभिनेत्री रानी मुखर्जी पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूडपासून अनेक दिवसांपासून दूर असलेली अभिनेत्री रानी मुखर्जी पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. २०१४ मध्ये मर्दानी चित्रपटात तिने काम केले होते. त्यानंतर एका नव्याकोऱ्या चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे नाव आहे 'हिचकी.' या चित्रपटात रानी एका शिक्षिकेच्या भुमिकेत दिसणार आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
तिला वारंवार उचकी येत असल्याचा त्रास असतो. त्यामुळे तिला नोकरी मिळत नसते. पण खूप प्रयत्नांनंतर तिला नोकरी मिळते. त्या शाळेत तिला गरीब मुलांना शिकवायचे असते. पण ती मुलं खूप दंगा करणारी असतात. त्यांना रानी शिक्षिका म्हणून आवडत नसते. मात्र तिच्या वागणूकीतून ती मुलांमध्ये बदल घडवून आणते. हीच चित्रपटाची कथा आहे.
कधी होणार प्रदर्शित?
मात्र हे कसे होते, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रदर्शित होईल. यशराज बॅनरची निर्मीती असलेला या चित्रपटाचे सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी दिग्दर्शन केले आहे.