मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या 'मर्दानी २' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटात ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. तर दुसरीकडे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. अभिनेता रणवीर सिंगसारखा कुर्ता घातल्यामुळे ती ट्रोल होत आहे. हा कुर्ता रणवीरने त्याच्या वाढदिवसच्या दिवशी घातला होता. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध डिझायर सब्यसाचीने हा कुर्ता डिझाइन केला आहे. सब्यसाचीने राणीचा फोटो इन्स्टाग्राम पोस्ट केल्यानंतर मोठ्याप्रमाणात ट्रोल झाला. हा कुर्ता रणवीरच्या कुर्त्या सारखाच असल्याचे वक्तव्य एका नेटकऱ्याने केलं आहे. 


राणी लवकरच 'मर्दानी २' चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील काही वास्तव जगासमोर आणण्यासाठी सज्ज झाली आहे. देशात अत्याचार, बलात्कार यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक घडलेल्या घटनांवर चित्रपटं देखील साकारण्यात आले आहेत. 


या चित्रपटात राणी एका निर्भिड पोलिसाच्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे. ‘मर्दानी २’ चित्रपट 'मर्दानी' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 'यशराज फिल्म'च्या बॅनर खाली साकारण्यात येत असलेल्या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. 


‘मर्दानी २’चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुथरेण करणार आहेत. गोपी पुथरेण या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करणार आहेत. १३ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.