मुंबई : पैश्याची जादू खरं तर फार वेगळी आहे. पैश्यांमध्ये संपूर्ण परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रेष्ठ. म्हणायचं झालं तर पैश्यानं माणुसकीला विकत घेतलं आहे. सध्या सर्वत्र रानू मंडल यांच्या चर्चा रंगत आहेत. राहण्यासाठी घर नव्हतं, खाण्यासाठी अन्न नव्हतं. जवळ होता तो फक्त देवाने दिलेला आवाज. त्याच आवाजामुळे त्यांना आता कोणाच्या ओळखीची गरज राहिलेली नाही. देवानं दिलेल्या आवाजावर त्यांनी स्वत:ची एक नवीन ओळख निर्माण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रानू मंडल प्रसिद्धीझोतात आल्यानंतर त्यांच्या मुलीला त्यांची आठवण आली आहे. गेले १० महिने आपली आई कोठे होती याचा पत्ता सुद्धा नसणारी त्यांची मुलगी आता आईच्या शोधात आली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजात त्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात असत. पण त्या आता एका रात्रीत सिंगिग सेंसेशन झाल्या आहेत. 


रानू मंडल त्यांच्या मुलीपासून तब्बल १० वर्ष लांब राहिल्या आहेत. विद्रुप दिसत असल्यामुळे त्यांच्या मुलीने त्यांना सोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होताच त्यांची मुलगी त्यांच्याकडे धावत आली आहे. त्यांची मुलगी त्यांच्याकडे परत आल्यामुळे त्यांना फार आनंद होत आहे.


रानू हिमेशच्या 'हॅपी हार्डी और हिर' या बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून पार्श्वगायन करणार आहेत. या चित्रपटात त्या 'तेरी मेरी कहानी' हे गाणं गाताना दिसणार आहेत. त्याचप्रमाणे खुद्द हिमेशने सुद्धा 'तेरी मेरी कहानी' गण्याला आवाज दिला आहे. रानू आणि हिमेशचा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.