रणवीर सिंगच नव्हते तर बॉलिवूडच्या `या` अभिनेत्यांनी केलंय न्यूड फोटो शुट, पाहा फोटो
या यादीतील नाव पाहून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. चला जाणून घेऊयात.
मुंबई : सध्या रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट चर्चेचा विषय आहे. त्याचे काही न्यूड फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर त्याचे अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. त्याने असं का केलं किंवा त्याला अशी काय गरज होती? असे अनेक प्रश्न लोकांकडून उपस्थीत केले जात आहेत. परंतु तुम्हाला माहितीय का की, बॉलिवूडमधील तो असा एकमेव व्यक्ती किंवा हिरो नाही ज्याने असं न्यूड फोटो शुट केलं आहे. यापूर्वी देखील अनेक अभिनेत्यांनी असं फोटो शुट केलं आहे.
या यादीतील नाव पाहून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. चला जाणून घेऊयात.
राहुल खन्ना
दिवंगत अभिनेता विनोद खन्ना यांचा मोठा मुलगा आणि अक्षय खन्ना यांचा भाऊ राहुल खन्नाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर स्वतःचा न्यूड फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर लोक अभिनेत्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
जॉन अब्राहम
फिल्मस्टार जॉन अब्राहम त्याच्या सुंदर लूकने अनेक मुलींना वेड लावले आहे. तो त्याच्या फिटनेसबाबत खूप सजग आहे. जॉन अब्राहमने काही काळापूर्वी इन्स्टाग्रामवर आपले न्यूड फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली होती. या फोटोमध्ये जॉन हातात उशी घेऊन दिसत आहे.
मिलिंद सोमण
मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणला चाहते कसे विसरतील. या फिल्म स्टारने त्याच्या मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये असे बोल्ड फोटोशूट केले होते. याशिवाय 52 व्या वाढदिवसालाही मिलिंद सोमणने त्याच्या ट्विटर हँडलवर हे छायाचित्र शेअर करून दहशत निर्माण केली.
विद्युत जामवाल
बॉलीवूडचा ऍक्शन स्टार विद्युत जामवाल यानेही काही काळापूर्वी न्यूड फोटोशूटद्वारे त्याच्या चाहत्यांना ट्रीट दिली होती. या छायाचित्रात हा फिल्मस्टार डोंगराळ भागात फक्त टॉवेल गुंडाळून जमिनीवर झोपलेला दिसत आहे.
सुशांत सिंग राजपूत
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतही त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. या फिल्मस्टारने एका प्रसिद्ध मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे.
रणवीर सिंग
आपल्या सर्वोत्तम कामगिरीने आपली क्षमता सिद्ध करणारा रणवीर सिंग त्याच्या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा चर्चेत असतो. अलीकडेच त्याच्या काही फोटोंमुळे तो चर्चेत आला आहे. वास्तविक रणवीर सिंगचे काही न्यूड फोटोज इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत.
आमीर खान
सिनेमा पीकेमध्ये एका सिनमध्ये अभिनेता आमीर खानने विनाकपडे शुट केलं आहे. आणि याचे पोस्टर देखील तयार करण्यात आले होते.