Bollywood Stars Earning: देशात कोरोनानंतर सर्व काही बदलले आहे. खासकरून चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग पुर्णत तुटला आहे आणि ओटीटीकडे (OTT) वळला आहे.त्यामुळे मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या अनेक बड्या अभिनेत्यांना (Bollywood Stars) मोठं नुकसान सहन कराव लागत आहे. चित्रपट चालण्यापासून ते कमाईपर्यंत अभिनेत्यांना (Bollywood Actors)मोठा तोटा होतोय. हे अभिनेते नेमके कोण आहेत, ते जाणून घेऊयात.  


'हे' आहेत अभिनेते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 या चालू वर्षात बॉलिवूडच्या (Bollywood Stars) टॉप स्टार्सच्या कमाईत मोठी घट झाली आहे. या टॉप स्टार्समध्ये बिग स्क्रीन खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सिम्बा रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचे नाव आहे. जाहिरातींमधून मिळणाऱ्या रकमेत घट झाल्यामुळे या स्टार्सना कमाईत मोठा धक्का बसला आहे.  


कमाईत इतकी घट ?


बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, संपूर्ण बॉलिवूडमध्ये (Bollywood) टॉप स्टार्सच्या दरात घट झाली आहे. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) सारख्या टॉप एंडॉर्सरना (Top Endorse) जाहिरातींमधून मिळणाऱ्या रकमेत घट झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे. बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार्सच्या जाहिरातींचे दर 10 ते 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या कमाईवर झाला आहे. ही कसर भरून काढण्यासाठी हे कलाकार आता वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आणखी भर घालण्यात व्यस्त आहेत.


अभिनेत्यांची कमाई किती? 


मीडिया रिपोर्टनुसार,गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये, रणवीर सिंह (Ranveer Singh)  $158.3 दशलक्ष आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) $139.6 दशलक्ष ब्रँड मूल्यासह बॉलीवूड कलाकारांमध्ये सर्वाधिक जाहिरात फी होती. मात्र कोरोना महामारीनंतर त्यांच्या कमाईत घट झाली आहे.


अक्षय-रणवीर जाहिरातीसाठी किती कोटी घेतात? 


मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंह (Ranveer Singh)  41 ब्रँड्सची जाहिरात करतो. यामध्ये चिंग्ज, बिंगो, निव्हिया आणि कोलगेट यांचा समावेश आहे. रणवीर एका जाहिरातीसाठी 3.4 कोटी ते 4 कोटी रुपये घेतो. अक्षय कुमार (Akshay Kumar) हॉडा, निरमा, पॉलिसी बाजार, लिव्हगार्ड एनर्जी, हार्पिक, सुथॉल, डॉलर, टाटा मोटर्स, पीसी ज्वेलर्स, रिव्हिटल एच, लीव्हर आयुष आणि कार्ड देखो यांसारख्या किमान 30 ब्रँडशी संबंधित आहे. तो शूटिंगसाठी दररोज अंदाजे 2 ते 3 कोटी रुपये घेतो.


दरम्यान अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रणवीर सिंहला (Ranveer Singh) जाहिरातींमधून मिळणाऱ्या रकमेत घट झाल्यामुळे त्यांच्या कमाईत मोठी घट झाली आहे. त्यामुळे या अभिनेत्यांना मोठा धक्का बसला आहे.