मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) नुकताच अबुधाबी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशन स्पर्धेत सहभागी झाला होता. रणवीरनं बास्केटबॉलपटूंना त्याच्या तालावर जबरदस्त डान्स करायला लावला. आता रणवीर आणि ऑलिम्पिक चॅम्पियन सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला (Neeraj Chopra) 'इंडियन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार देण्यासाठी क्रिकेटर कपिल देवही मंचावर उपस्थित होते. आता रणवीरनं नीरजला देखील त्याच्या तालावर डान्स करायला लावलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीरनं नीरजसोबत या अवॉर्ड फंक्शनला धूम ठोकली. या दोघांचा स्टेजवरील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडिओ नीरज चोप्राच्या फॅन क्लबच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर त्याच्या 'सिम्बा' चित्रपटातील 'मेरा वाला डान्स' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्याच्या गाण्याच्या प्रत्येक ओळीवर तो नीरज चोप्राला डान्स स्टेप्स शिकवताना दिसत आहे. नीरजही रणवीरची हुबेहूब कॉपी करतोय. 



याशिवाय नीरजचा आणखी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत नीरज अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun)  दिसत आहे. व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनसोबत दिसणारा नीरज पुष्पा चित्रपटाच्या फायर डायलॉगच्या स्टेपची कॉपी करताना दिसत आहे. (Ranveer Singh Dances With Olympic Champion Neeraj Chopra And He Does The Pushpa Pose With Allu Arjun Video Viral) 



टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक कमावत इतिहास रचला होता. ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज देशातील पहिला खेळाडू ठरला होता. या कामगिरीमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली.