मुंबई : आलिया भट्टचं नाव सध्या बॉलीवूड तसंच साऊथ चित्रपटांमध्ये खूप गाजत आहे. एकीकडे आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट आहे तर दुसरीकडे 'RRR' चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर आलिया आणि रणवीरचा व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर साऊथच्या RRR चित्रपटातील गाणीही समोर आली आहेत. जी लोकांना खूप आवडत आहेत. दरम्यान, रणवीर सिंग आलिया भट्टच्या चित्रपटांसाठी खूप उत्सुक दिसत आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे ज्यामध्ये तो आलिया भट्टच्या ढोलिडा गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.


अभिनेता रणवीर सिंगने एका ईव्हेंटमध्ये आलिया भट्टच्या 'ढोलिडा' गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रणवीर सिंग अभिनेत्री आलिया भट्टच्या स्टेप्स करत आहे आणि त्यानंतर आलिया भट्ट त्याच्यासोबत हुकअप स्टेप करते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडिओमध्ये रणवीर कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. तर दुसरीकडे, आलिया भट्टने पांढरी शिफॉन मिक्स साडी घातली आहे.  ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे आणि या साडीमध्ये तिने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो देखील शेअर केले आहेत.


एका रिपोर्टनुसार, रणवीर सिंगने सांगितलं की, तो आलियाच्या RRR चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे, यावरून असं दिसून येतंय की, रणवीर देखील साऊथ इंडस्ट्रीपासून प्रभावित आहे आणि तो देखील साऊथ सिनेमात पाऊल ठेवू शकतो.