मुंबई : ‘पद्मावत’ या सिनेमातील अभिनेता रणवीर सिंह याच्या अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे. आता त्याच्या या भूमिकेचं कौतुक करणारं अमिताभ बच्चन यांचं पत्र त्याला मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून पत्र आल्याने रणवीर सध्या चांगलाच खुश आहे. त्याचा हा आनंद त्याने ट्विटरच्या माध्यमातून समोर आणला आहे. 


अमिताभ बच्चन यांच्याकडून मिळालेलं पत्र त्याने ट्विटरवर शेअर केलं आहे. त्याने त्याने लिहिले ली, ‘मुझे मेरा अवॉर्ड मिल गया’. 



रणवीर सिंह हा अमिताभ बच्चन यांचा किती मोठा फॅन आहे हे त्याने वेळोवेळी सांगितलं आहे. अमिताभ बच्चन हे कलाकारांच्या भूमिकांचं कौतुक करण्यासाठी त्यांना पत्र लिहितात. 


याआधी अमिताभ बच्चन यांनी कंगना राणावत हिला ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘क्वीन’ मधील काम आवडल्याने पत्र लिहिलं होतं. तसेच सुशांत सिंह राजपूत याला ‘एमएस धोनी’ सिनेमातील कामासाठी पत्र लिहिलं होतं तर दीपिकाला तिच्या ‘रामलीला’ सिनेमातील कामासाठी पत्र लिहिलं होतं.