या ट्विटमुळे रणवीर सिंग झाला ट्रोल
संजय लीला भंसाळी यांचा बहूप्रतिक्षित सिनेमा `पद्मावती` लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : संजय लीला भंसाळी यांचा बहूप्रतिक्षित सिनेमा 'पद्मावती' लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.
आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'पद्नावती' चित्रपटाचा पहिला लूक रसिकांच्या भेटीला आला आहे.
अभिनेत्री दीपिका पादूकोण या चित्रपटात 'पद्मावती'ची भूमिका साकारत आहे. पहिल्या पोस्टर लूकमध्येही केवळ दीपिकाचा लूक रिलीज करण्यात आला आहे. लाल भरजरी वस्त्रांमध्ये, शाही अलंकाराने सजलेल्या दीपिकाचा हा अगदी शाही लूक आहे.
पद्मावती चित्रपटाचे पहिले पोस्टर अभिनेता रणवीर सिंगनेही शेअर केले. मात्र त्या खाली त्याने ‘मल्लिका-ए-चित्तोड, पद्मावती' असे कॅप्शन लिहिले. महाराणी की मल्लिका ? या मुद्द्यावरून रणवीर ट्विटरवर ट्रोल झाला. पद्मावतीला मल्लिका नाही तर महाराणी म्हटलं पाहिजे असं काही ट्विटर यूजर्सचे म्हणणे आहे.
दीपिका, रणवीर, शाहिदची ऐतिहासिक भूमिका असलेला ‘पद्मावती’चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. व्हायकॉम १८ पिक्चर्स आणि भन्साळी प्रॉडक्शन्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.