Ranveer Singh On Casting couch: अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) म्हणजे तरुणांच्या गळ्यातील ताईत...अनेक सुपरहिट चित्रपटामुळे रणवीरची एनर्जाटिक बॉय (Energetic Boy) म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. आज तो अव्वल स्थानी विराजमान आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत (Bollywood) या खास स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी रणवीरने खूप संघर्ष केलाय. मात्र, तुम्हाला माहितये का रणवीर सिंह देखील कास्टिंग काऊचचा (Casting Couch) शिकार झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच रणवीर मॅराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Marrakech International Film Festival) पोहोचला आणि त्यादरम्यान त्याने त्याचा अनुभव सांगितला. रणवीरचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर (Ranveer Singh casting couch experience) खूप चर्चेत आहे. एका निर्मात्याने पार्टीत त्याच्यासोबत असं कृत्य केलंय की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.


काय म्हणाला रणवीर सिंह?


रणवीरने या कार्यक्रमात सांगितलं की, एका निर्मात्याने त्याला पार्टीसाठी बोलावलं आणि नंतर कुत्र्याला पाठीमागे सोडलं. पार्टीतील पाहुण्यांचं मनोरंजन करण्यासाठी त्यानं मला वेगवेगळ्या कृती करण्यास सांगितलं. आता तो निर्माता या जगात नाही, असंही रणवीर म्हणाला.


याशिवाय त्यानं कास्टिंग काऊचचा आपला अनुभवही शेअर केला. एका व्यक्तीने त्याला एका अनोळखी ठिकाणी बोलावून विचारलं, तु हार्ड वर्कर आहे की स्मार्ट वर्कर? मी स्वतःला हुशार समजत नाही म्हणून मी त्यांना सांगितलं की मी एक हार्ड वर्कर आहे. तो माणूस म्हणाला... स्मार्ट हो, सेक्सी हो. तर 3 वर्षे मी या सगळ्याचा सामना केला आणि ते सर्व अनुभवूनच मी आज या टप्प्यावर पोहोचलो आह, असं रणवीर म्हणालाय.


आणखी वाचा - Web Series: बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या 'या' वेब सिरीज एकट्यातच पाहा!


दरम्यान, गुंडे, दिल धडकने दो, बाजीराव मस्तानी, बेफिक्रे, पद्मावत, सिम्बा, गली बॉय आणि 83 यांसारखे चित्रपट रणवीरने (Ranveer Singh Movies) गाजवले आहेत. त्यानंतर आता रणवीरचे आणखी दोन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.