मुंबई : अभिनेता रणवीर सिंग यानं नुकतचं केललं न्यूड फोटोशूट सध्या चांगलेच चर्चेत आहे. अनेकांनी त्याच्या या फोटोशूटवर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या तर काहींनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. आता हे फोटोशूट करणं रणवीरला चांगलंच महागात पडलं आहे.  न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगला समन्स बजावण्यात आलंय. समन्स देण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले. मात्र तो घरी नव्हता. त्यानंतर पोलिसांनी 22 तारखेला चौकशीसाठी हजर होण्याचं समन्स बजावलंय. रणवीरविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंगने काही दिवसांपुर्वी पेपर मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं. त्यानंतर रणवीरच्या या फोटोशूटवर अनेकांनी चीड व्यक्त केली. न्यूड फोटोशूटनंतर दिवसागणिक अभिनेत्याच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.


महत्त्वाचं म्हणजे, रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर अनेक सेलिब्रिटींनी स्वतःचे न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, ज्यामुळे एकप्रकारे न्यूड फोटोंचा सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झालं... असं म्हणायला हरकत नाही. 


रणवीरचे आगामा सिनेमे 
रणवीर सिंगने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या सिनेमाचे शूटिंग पुर्ण केले आहे. आणि लवकरच त्याचा आलिया भट्टसोबतचा करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा रिलिज होणार आहे.