VIRAL VIDEO : `जस्ट लूकिंग लाइक ए वाव...` रणवीर सिंगनं नीता यांच्यावर कमेंट करताच मुकेश अंबानींनी दिली अशी रिअॅक्शन
Ranveer Singh tells Nita Ambani she is `just looking like a wow` : रणवीर सिंगनं नीता अंबानी यांची केली हटके स्तुती पाहताच मुकेश अंबानी यांनी दिली अशी रिअॅक्श... व्हिडीओ होतोय व्हायरल
Ranveer Singh tells Nita Ambani she is 'just looking like a wow' : अंबानी कुटुंबाच्या सगळ्याच गोष्टी खूप लग्झरीअस असतात. गेल्या अनेक दिवसांपासून ते वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता अंबानी कुटुंबानं रिलायन्सचं लग्झरीयस शॉपिंग मॉल जिओ वर्ल्ड प्लाझाला लॉन्च केलं आहे. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. इतकंच नाही तर काही कलाकारांनी यावेळी रॅम्पवॉक देखील केला. या सगळ्या कलाकारांमध्ये अभिनेता रणवीर सिंगनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यावेळी त्यांन नीता अंबानी यांची ज्या प्रकारे स्तुती केली त्यांनं सगळ्यांचे लक्ष वेधले, इतकंच नाही तर मुकेश अंबानी देखील हसू लागले होते.
खरंतर रणवीर जेव्हा स्टेजवर आला तेव्हा त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले. सुरुवातीला रणवीरच्या रॅम्प वॉकच्या प्रेमात सगळे पडले तर पावर हाऊस रणवीरनं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. यात रणवीर खूप हॅन्डसम दिसत होता. यानंतर स्टेजवर आलेला रणवीर नीता अंबानी यांना भाभी बोलत त्यांची स्तुती केली. त्यांच्या सुंदरतेला तो Wow असं म्हणाला. रणवीर यावेळी सध्या सोशल मीडियावर असलेला ट्रेंड, म्हणजेच जास्मिन कौरच्या व्हायरल रीलचा डायलॉग वापरताना दिसला. रणवीरनं त्या कॅची फ्रेझपासून सुरुवात केली आणि हसत म्हणाला, सो ब्युटिफूल, सो एलिगन्ट, जस्ट लूकिंग लाइक ए वाव... जस्ट लूकिंग लाइक ए वाव. रणवीर असं बोलत असताना नीता अंबानी आणि मुकेश अंबानी हसताना दिसले. पुढे रणवीर म्हणाला की संपूर्ण जग त्यांना श्रीमती नीता मुकेश अंबानी या नावानं ओळखतात. आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि प्रेमानं त्यांना वहिनी बोलतो. त्या खूप प्रेमळ आहेत. दरम्यान, नीता अंबानी या लगेच रणवीरला फ्लाईंग किस देतात. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ -
हेही वाचा : PHOTO : श्लोका मेहता आणि राधिकानं फॅशनमध्ये अभिनेत्रींनाही टाकलं मागे
रॅम्प वॉक करत असलेल्या रणवीरनं संपूर्ण अंबानी कुटुंबाला ग्रीट केलं. तर रणवीर सिंग रॅम्प वॉक करत असताना ईशा अंबानीनं सगळ्यांते लक्ष वेधले आहे. या कार्यक्रमात रणवीर सिंगशिवाय, दीपिका पदुकोणस जान्हवी कपूर, सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर, जॉन अब्राहम, करीना कपूर खान आणि अरिजीत सिंगसोबत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.