मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह याच्या कारला एका बाईक वाल्याने मागून हलकी ठोकर दिली. वांद्र्यात हा प्रकार घडला. हा किरकोळ प्रकार होता. यामध्ये रणवीर अथवा बाईकस्वार कोणालाही इजा झाली नाही. पण रणवीर स्वत:गाडीतून बाहेर आला आणि त्याने आपल्या गाडीला काही लागलंय का हे उतरुन पाहीलं.  रस्त्यावर अचानक रणवीर दिसल्याने गर्दीचे डोळे विस्फारले. आणि या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोग्राफर विराय भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केलीय. यामध्ये वांद्रे येथे एक बाईक रणवीर सिंहच्या गाडीला ठोकर देते. रणवीर बाहेर येऊन गाडी पाहतो आणि दुसऱ्या मिनिटाला गाडीत जाऊन बसतो. 



कामाच्या बाबतीत बोलायच झालं तर रणवीर लवकरच कबीर खान यांच्या '८३' सिनेमात कपिल देवच्या भूमिके दिसणार आहे. तसेच तो यशराज बॅनरच्या 'जयेश भाई जोरदार' मध्ये देखील दिसणार आहे.