Ranvir Shorey and Armaan Malik Fight : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा कॉन्ट्रोवर्शियल शो 'बिग बॉस ओटीटी 3' चांगलाच चर्चेत आहे. अनिल कपूर त्यांच्या झक्कास अंदाजात या शोचे सुत्रसंचालन करताना दिसत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये देखील एकापेक्षा एक असे सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी शोमध्ये बॉलिवूड कलाकारांपासून छोट्या पडद्यावरील कलाकार, पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि युट्यूबर पाहायला मिळत आहेत. 21 जून रोजी या शोचा प्रीमियर झाला. अनिल कपूर यांनी सगळ्यांना या स्पर्धकांची ओळख करुन दिली. त्यानंतर बिग बॉसच्या घरात गेलेल्या स्पर्धकांमध्ये वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. सगळ्यात आधी विशाल पांडे आणि पौलमी दास यांच्याद वाद झाला आणि त्यानंतर आता रणवीर शौरी आणि अरमान मलिक यांच्यात मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळते. 


काय होतं संपूर्ण प्रकरण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी हा नेहमीच स्पष्ट वक्तव्य करताना दिसतो. रणवीरनं यावेळी शोमध्ये देखील त्याला वाटेल तसं स्पष्ट बोलण्यास सुरुवात केली आहे. biggbossott3.tazakhabar च्या रिपोर्टनुसार, रणवीरनं क्रितीकासोबत गैरवर्तन केलं आहे. क्रितीका म्हणाली मन मोठं असायला हवं. हे ऐकताच रणवीर म्हणाला मनसोबत... देखील मोठं असायला हवं. रणवीरनं जे वक्तव्य केलं त्यातील या शब्दाला म्यूट करण्यात आलं. पण अरमानला रणवीरचं वक्तव्य आवडलं नाही. त्यानंतर रणवीर आणि अरमानमध्ये भांडण झालं. तर दुसरीकडे रणवीरनं त्याच्या चुकीसाठी माफी मागितली. सध्या त्या संबंधीत पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 



हेही वाचा : बॉडीगार्डनं दिव्यांग चाहत्यासोबत केलेली वागणूक भोवली! नागार्जुनला मागावी लागली माफी


दरम्यान, अरमान मलिकविषयी बोलायचे झाले तर तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये आला आहे. पायल आणि क्रितीकाला शोमध्ये एकत्र पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. अरमान हा नेहमीच त्याच्या दोन्ही लग्नांमुळे चर्चेत असतो. सोशल मीडिया आणि युट्यूबवर अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नींचे लाखो चाहते आहेत. अरमान मलिकशिवाय या शोमध्ये पायल मलिक, कृतिका मलिक, नीरज गोयत, सना मकबूल, साई केतन राव, पौलमी दास, शिवानी कुमारी, सना सुल्ताना, शिवानी कुमारी, दीपक चौरसिया, चंद्रिका दीक्षित, विशाल पांडे, लव कटारिया, मॅक्सएक्सटर्न, रॅपर नॅजी देखील दिसत आहेत.