Ranvir Shorey Smoked Cigarette in Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस' च्या प्रत्येक सीझनमध्ये वेगळ्या ठिकाणी स्मोकिंग एरिया बनवला जातो. जिथे कंटेस्टंट्स स्मोक म्हणजेच धुम्रपान करताना दिसतात. कधीच कोणत्याच स्पर्धकाला घराच्या आत सिगारेट फुकण्याची परवानगी नव्हती. आता हे या सीझनमध्ये 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये झालं. या सीझनमध्ये रणवीर शौरी हा नियम मोडताना दिसला. असं म्हटलं जातं की त्याला लाइव्ह फीडमध्ये लिव्हिंग एरिया म्हणजेच घराच्या आता सोफ्यावर बसून धुम्रपान करताना पाहिलं. सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे बिग बॉसनं देखील त्याला असं करु दिलं, त्याला अडवलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर शौरी हा बॉलिवूड अभिनेता असून त्यानं एन्ट्री करण्याआधी सुत्रसंचालक अनिल कपूर यांना सांगितलं की त्याच्याकडे कोणतंही काम नव्हतं. त्यामुळेच तो या शोमध्ये आला आहे. तो शोमध्ये चर्चेत राहिला. त्यानं त्याचं मत त्याला हवं त्या पद्धतीनं मांडलं. इतकंच नाही तर कोणाला सडेतोड उत्तर द्यायला तो घाबरला नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शोमध्ये बाहुल्यांसोबत मिमिक्री करण्याचा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला. पण आता तो प्रेक्षकांच्या निशाण्यावर आला आहे. त्याचं कारण बिग बॉस ओटीटीच्या घरात जाऊन त्यानं धुम्रपान केलं. याचाच अर्थ त्यानं शोमध्ये येऊन एक मोठा नियम मोडला आहे. लाईव्ह फीडमध्ये रणवीर शौरीनं हा साई केतन रावसोबत सोफ्यावर बसल्याचे पाहायला मिळते. त्याच्या हातात सिगारेट देखील पाहायला मिळत आहे. असं म्हटलं जातं की लाइव्ह फीड म्हणजेच 24 तास सुरु असणाऱ्या फीटमध्ये त्याला 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात धुम्रपान करताना दिसले. या आधी असं 'बिग बॉस ओटीटी' मध्ये असं कधीच घडलं नव्हतं. 



हेही वाचा : 56 व्या वर्षी अरबाज होणार वडील? शुरा खानच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच चर्चा


या आधी 'बिग बॉस 16' मध्ये साजिद खानला अनेकदा गार्डन एरियामध्ये म्हणजेच स्मोकिंग एरियाच्या बाहेर येऊन सिगारेट पिताना दिसले आहे. जेव्हा प्रेक्षकांमध्ये निर्मात्यांवरुन चर्चा होऊ लागली ते चिडले. तेव्हा साजिदला बिग बॉसनं स्वत: अनेकदा सांगितले पण त्याच्यावर काहीही एक परिणाम झाला नाही. या शोमधून दोन एलिमिनेशन झाले आहेत. 16 मधून 2 स्पर्धक बॉक्सर नीरज गोयत आणि यूट्युबर पायल मलिक आहेत. आता पौलमी दासला एलिमिनेट करण्यात आलं आहे.