मुंबई : बॉलिवूड रॅपर बादशाह सध्या इंडियाज गॉट टॅलेंट या शोला जज करत आहे. या शोमध्ये बादशाहची वेगळी स्टाइल लोकांना खूप आवडली आहे. बादशाहसोबत शिल्पा शेट्टीही या शोला जज करत आहे. शिल्पा शेट्टीने स्वतःचा फिटनेस चॅट शो आणला आहे. ज्यामध्ये ती सेलिब्रिटींशी त्यांच्या फिटनेस आणि मानसिक आरोग्याविषयी बोलत आहे. नुकताच बादशाह शिल्पाच्या शोमध्ये आला होता. जिथे तो त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलला. बादशाह डिप्रेशनचा शिकार झाला होता. याविषयी त्याने शोमध्ये चर्चाही केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बादशाहने शिल्पाला सांगितलं की, माझ्या आयुष्याची प्राथमिकता मानसिक आरोग्य आहे. मेंटल पीस ही माझ्यासाठी एक लक्झरी आहे. कारण मला दररोज दबाव जाणवतो. मी माझ्या काळोख्या काळात जगलो आहे. माझ्या मानसिक आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, मी क्लिनिकल डिप्रेशन आणि एंग्जायटी डिसऑर्डर विकारातून गेलो आहे. म्हणून माझी इच्छा आहे की, मी पुन्हा त्या गोष्टीतून जाऊ नये आणि ते टाळण्यासाठी, तुम्हाला स्वार्थी असणं खूप महत्वाचं आहे.


खुश रहावं सगळ्यांनी
बादशाह पुढे म्हणाला की, तुम्हाला जे लोकं खुश ठेवतात अशा लोकांसोबत तुम्ही रहा. तुम्हाला नाही म्हणायला शिकलं पाहिजं. आनंदी राहण्यासाठी हो म्हणायलाही शिकलं पाहिजे. आपण खूप दबावाखाली जगतो. आपण आपलं आयुष्य गडबडले आहे आणि मग आपण मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्याची तक्रार करतो. तुम्हाला गोष्टी व्यवस्थित करायला शिकलं पाहिजे. तुम्ही तुमची खास माणसं सोबत ठेवावीत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बादशाहने वजन कमी करण्याच्या त्याच्या प्रेरणाबद्दल सांगितलं. आता निरोगी राहणं महत्वाचं आहे. माझ्याकडे वजन कमी करण्याची अनेक कारणं आहेत. लॉकडाऊनमध्ये आम्ही कोणतेही शो केले नाहीत आणि त्यानंतर अचानक शो होऊ लागले. स्टेजवर गेल्यावर मला जाणवलं की माझ्यात स्टॅमिना नाही. माझ्या कामासाठी मला 120 मिनिटे एक्टिव्ह असणं आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा मी स्टेजवर गेलो तेव्हा माझ्यात स्टॅमिना नव्हता आणि मी 15 मिनिटांत थकत होतो. एक कलाकार म्हणून मला माझं सर्वोत्तम देणं आवश्यक आहे. माझं वजन कमी होण्याचं मुख्य कारण हेच होतं.