मुंबई : काही लोकं आपला स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. आपल्या देशातील बहुतेक लोक त्यांच्या कमाई आणि गुंतवणूकीबद्दल मौन बाळगतात, मात्र परदेशात तसं नाहीये. कदाचित तुम्हाला आठवत असेल की,  अमेरिकेचा सुप्रसिद्ध रॅपर लिल उझी व्हर्टने फेब्रुवारीमध्ये त्याच्या दोन भुवयांच्यामध्ये एक हिरा लावला होता. आता त्याचा अब्जावधीचा हा हिरा चोरीला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्दीत अब्जावधी किमतीचा हिरा गेला चोरीला
मियामी, फ्लोरिडा, अमेरिका येथे राहणारा Rapper Lil Uzi Vert, अनेकदा कॉन्सर्टला जातो. त्याचा छंद असो किंवा भीती, त्याने त्याच्या कपाळावर अब्जावधी किमतीचा हिरा लावला होता, म्हणजेच दोन्ही डोळ्यांच्या अगदी मध्यभागी. त्याला वाटलं की, यामुळे तो सुरक्षित आहे, पण गर्दीत त्याच्या एका चाहत्याने त्याचा हिरा गायब केला.


जुलैमध्ये गायब
रॅपरच्या मते, जुलैमध्ये मियामी येथे रोलिंग लाऊड ​​फेस्टिव्हल दरम्यान हा हिरा गायब झाला होता. त्यावेळी जमावाने त्याला घेरलं. जेव्हा तो गर्दीतून बाहेर आला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, त्याच्या कपाळावरील हिरा गायब झाला आहे. या हिऱ्याची किंमत सुमारे 1 अब्ज 72 कोटी होती.


सर्जरीद्वारे केला होता फिट
Rapper Lil Uzi Vertv ने हा हिरा सर्जरीद्वारे बसवला होता. मात्र, काही काळापासून, त्याच्या हिऱ्याभोवती स्किनमधून रक्त येऊ लागलं आहे आणि तो ते काढून टाकण्याचा विचार करत होता. पण त्याआधीच त्याच्यासोबत हा अपघात झाला.