Rashmika Mandana : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही काही दिवसांपूर्वी तिच्या 80 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी चर्चेत आली होती. आता रश्मिकाशी 80 लाख रुपयांची फसवणूक करणारी कोणी बाहेरची व्यक्ती नाही तर तिच्या मॅनेजरनं केल्याचे म्हटले जातं होतं. जेव्हा रश्मिकाला याविषयी कळलं तेव्हा तिनं मॅनेजरला कामावरून काढून टाकलं होतं. तर हा मॅनेजर रश्मिकाच्या करिअरच्या सुरुवातीपासून सोबत आहे. त्यानंतर आता रश्मिका आणि तिच्या या मॅनेजरनं अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. यावेळी त्यांनी खुलासा केला की एकत्र न काम करण्याचा निर्णय त्या दोघांनी विचार करून केला आहे. कोणी कोणाला कामावरून काढले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रश्मिका आणि तिच्या मॅनेजरनं गुरुवारी म्हणजेच काल 22 जून रोजी हे अधिकृत स्टेटमेंट जारी केलं. या स्टेटमेंटमध्ये रश्मिका आणि तिचा मॅनेजर या दोघांचे म्हणणे स्पष्ट लिहिले आहे की, “आमच्यामध्ये कोणतीही नकारात्मकता नाही. आम्ही म्युच्युअली वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही का वेगळे होत आहोत, यामागच्या अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत, पण त्या अफवांमध्ये थोडंही तथ्य नाही. आम्ही एकाच व्यवसायात आहोत आणि आम्ही आतापासून स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.” 



पुढे त्यात म्हटले आहे की "काही मीडिया रिपोर्ट्समध्ये त्या दोघांचे विभक्त होण्यामागे अफवा पसरवण्यात आल्या. या स्टेटमेंटनंतर आता या सगळ्या इथेच थांबतील अशी आशा त्यांना आहे."



रश्मिकाची तिच्या मॅनेजरने 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र, हे दावे निव्वळ अफवा असून यात कोणतंही सत्य नसल्याचं रश्मिका व तिच्या मॅनेजरने म्हटलं आहे. दोघांनी मिळून यापुढे एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रश्मिकाला यावर कोणतीही चर्चा व्हायला नको अशी तिची इच्छा होती. त्यामुळे रश्मिकानं यावर काही वक्तव्य केलं नाही असं म्हटलं जातं होतं. त्यानंतर मात्र, त्या दोघांनी दिलेल्या या अधिकृत स्टेटमेंटनंतर या अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण त्या दोघांनी मिळून हा निर्णय घेतला होता. 


हेही वाचा : एका सीननं घेतला असता Aamir Khan चा जीव; काही सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं होणार होतं पण...


दरम्यान, रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच अभिनेता रणबीर कपूरसोबत 'एनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय अल्लू अर्जुनसोबत ती 'पुष्पा 2' मध्ये देखील दिसणार आहे.