`या` व्यक्तीसोबत Rashmika Mandana मालदीवमध्ये गेलीये सुट्टीवर; फोटो समोर
शुक्रवारी दोघंही मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले होते.
मुंबई : साऊथमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना सध्या मालदीवमध्ये सुट्टीवर गेले आहेत. शुक्रवारी दोघंही मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघंही एकत्र सुट्टीसाठी निघाले होते. आता, 'पुष्पा' अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मालदीवमधील विजयसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
रश्मिकाचे फोटो
फ्लोरल मॅक्सी ड्रेस परिधान केलेल्या रश्मिका मंदान्नाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून तिचा अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोच्या पार्श्वभूमीवर उष्णकटिबंधीय दृश्यासह मिरर सेल्फी क्लिक करण्यात आला आहे. अभिनेत्रीने फोटोला कॅप्शन दिलं आहे की,'हाय लव्ह'. याशिवाय तिने पांढऱ्या रंगाचा हार्ट इमोजीही हा फोटो शेअर केला आहे. आता सोशल मीडियावर चाहते रश्मिकाच्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकं रश्मिकाच्या लुकचे कौतुक करत आहेत तर काही रश्मिका आणि विजयवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
दोघांची जबरदस्त केमिस्ट्री
'गीता गोविंदा' आणि 'डियर कॉम्रेड' यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांची केमिस्ट्री नेहमीच चर्चेत असते. मात्र, दोघांनीही एकमेकांना फक्त मित्र म्हटलं आहे. बरं, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना काल म्हणजेच ७ ऑक्टोबरला मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. यादरम्यान, कपल पापाराझींशी फारसं बोललं नाही.
दोघं वेगवेगळ्या कारमधून आले असले तरी दोघांचं ध्येय एकच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका आणि विजय मालदीवमध्ये व्हेकेशनसाठी गेले आहेत. त्याचबरोबर, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी ना सत्य सांगितलं आणि ना त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांचं खंडन केलं. रश्मिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'गुडबॉय' रिलीज झाला आहे. ज्यामध्ये ती अमिताभ बच्चन आणि नीना गुप्तासोबत दिसली होती. याशिवाय तिच्याकडे अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा 2' आणि थलपथी विजयसोबत 'वारिसू' आहे.