Rashmika Mandanna Fact check Amitabh Bachchan React : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाचे लाखो चाहते आहेत. रश्मिकानं दिग्ग्ज अभिनेता  अमिताभ बच्चन यांच्या 'गुडबाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. रश्मिकाचा लवकरच 'अॅनिमल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसणार असून हा चित्रपट पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत. दरम्यान, या सगळ्यात चर्चा आहे ती रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ AI च्या मदतीनं तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार आणि रिसर्चर अभिषेक यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रश्मिका मंदाना आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर उत्सुकतेनं ती लिफ्टमध्ये घुसताना दिसते. अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती रश्मिका आहे असे वाटले, मात्र ती रश्मिका नाही. या व्हिडीओत दिसणार मुलगी ही जारा पटेल आहे. जारा ही ब्रिटिश-इंडियन आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 415K फॉलोअर्स आहेत. AI च्या Deepfake टेक्नॉलॉजीच्या मदतनं या त्या मुलीच्या चेहऱ्याच्या जागी रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. इतकंच नाही तर हा व्हिडीओ खरा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे खरा व्हिडीओ कोणता आणि खोटा हे कळत नाही आहे. मात्र, अभिषेक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जारा पटेलचा खरा व्हिडीओ शेअर केला आहे. 




अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली चिंता


इतकंच नाही तर स्वत: अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या व्हिडीओवरून चिंता व्यक्त करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की 'यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.' यानंतर त्यांनी पुन्हा एकदा हा व्हिडीओ शेअर करत 'माहिती' असं कॅप्शन दिलं आहे. 


हेही वाचा : सलमानच्या शोमध्ये अश्लील चाळे: लेकीचा इंटिमेट व्हिडीओ पाहून आई-वडील म्हणाले- लाज वाटते!


रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर रश्मिका आणि रणबीरचा 'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अमिताभ यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांचा आणि  प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय, दीपिका पदुकोण, कमल हासन दिसणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.