मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिकानं गुडबाय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रश्मिका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, नुकताच रश्मिकाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून रश्मिका आजारी आहे का असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) आजारपणाची बातमी समोर आल्यानंतर आता रश्मिकाच्या आजाराची चर्चा सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हेही वाचा : Gym मध्ये Workout करताना अनेक सेलिब्रिटींना Heart Attack; कोणतं वय जीमसाठी योग्य, जाणून घ्या


रश्मिकाचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केलेला आहे. या व्हिडीओत रश्मिका विमानतळावर असल्याचे दिसत आहे. रश्मिकानं पांढऱ्या रंगाचं हूडी आणि निळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


पाहा काय म्हणाले नेटकरी -


रश्मिकाच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी ती आजारी आहे का असा सवाल करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'रश्मिका इतकी बारीक कशी झाली? तिला पाहून मला आश्चर्य झालं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रश्मिका तर फिटनेसकडे खूप लक्ष देते. ती आता डायट करते का?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'रश्मिका आजारी आहे का?' (rashmika mandanna fighting with disease netizens ask her about her health is she ok) 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, रश्मिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला गुडबाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. ‘गुडबाय’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, रश्मिका मंदानासारखी तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १.२० ते १.४० कोटी रुपयांची कमाई केल्याचे बोलले जात आहे. ही रक्कम निर्मात्यांना अपेक्षित रकमेच्या खूप कमी असल्याने त्यांना धक्का बसला. पहिल्याच दिवशी रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसला.


प्रदर्शनाच्या आधी ‘गुडबाय’ला प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चित्रपटगृहात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी या चित्रपटाच्या टीमला अपेक्षा होती. पण पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यात फारसा रस दाखवला नाही