Rashmika Mandanna on Animal : गेल्या काही दिवसांपासून 'ॲनिमल' हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच त्याची सगळीकडे चांगलीच चर्चा होती. चित्रपटातील डायलॉग्स आणि सिन्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहिले आहे. चित्रपटातील रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना या दोघांची केमिस्ट्री पाहिली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारी प्रतिक्रिया पाहता रश्मिकाला देखील खूप आनंद झाला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं नाव गीतांजली आहे. आता रश्मिकानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी काय सांगितले होते याचा खुलासा केला आहे. 


काय म्हणाली रश्मिका?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रश्मिकानं चित्रपटातील बिहाइंड द सीनचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत रश्मिकानं लिहिलं की 'गीतांजली, जर मला तिच्या विषयी एका वाक्यात लिहायला सांगितलं तर ती घरातील एकमेव अशी व्यक्ती आहे जी कुटुंबाला एकत्र जोडून ठेवते. ती प्रेम, जसी आहे तशीच, कोणतंही फिल्टर न लावता हेड स्ट्रॉंग होते. कधी-कधी एक कलाकार म्हणून गीतांजली जशी प्रतिक्रिया देते त्यावर प्रश्न उपस्थित केले... मला आठवतय की माझ्या दिग्दर्शकांनी मला सांगितलं होतं की ही त्यांची कहाणी आहे... रणविजय आणि गीतांजलीची... हे त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांचं आयुष्य आहे.' 



पुढे रश्मिका म्हणाली की 'हिंसा, कोणाला दुखापत होणं आणि त्रास या जगात गीतांजली शांती आणि विश्वास आणण्याचा प्रयत्न करणार. ती तिच्या देवाची प्रार्थना करणार की तिच्या नवऱ्याला आणि मुलांना सुरक्षित ठेवा. ती एक डोंगरापणे होती जे सगळ्या समस्यांचा सामना करते. तिच्या कुटुंबाच्या हितासाठी तिच्याकडून जितकं होईल तितकं करत असते. माझ्या नजरेत गीतांजली खूप सुंदर आहे. ती त्या महिलांमधली आहे जी खूप स्ट्रॉंग पद्धतीनं तिच्या कुटुंबाची सुरक्षा करण्यासाठी उभी राहते. आमच्या टीमला 'ॲनिमल' च्या एका आठवड्यासाठी शुभेच्छा. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी आभार... यामुळे मला आणखी प्रयत्न करण्यासाठी आणि प्रत्येक चित्रपटासाठी आणखी जास्त मेहनत करण्यासाठी प्रेरणा मिळते. तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम.'


हेही वाचा : 'बेशरम रंग 2.0' 'फायटर' मध्ये हृतिक आणि दीपिकाचा इंटिमेट सीन पाहाताच नेटकऱ्यांना आली रणवीर सिंगची आठवण


'ॲनिमल' चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानं जगभरात 550 कोटींचा आकडा पार केला आहे.