कालिन भैय्याच्या वाढदिवसाला स्वतःला रोखू शकल्या नाहीत बीना त्रिपाठी; केली खास पोस्ट
![कालिन भैय्याच्या वाढदिवसाला स्वतःला रोखू शकल्या नाहीत बीना त्रिपाठी; केली खास पोस्ट कालिन भैय्याच्या वाढदिवसाला स्वतःला रोखू शकल्या नाहीत बीना त्रिपाठी; केली खास पोस्ट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2022/09/05/520217-bina-tripathi.jpg?itok=dJBEjJm2)
पंकज त्रिपाठी आज त्यांचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहेत
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेले पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आज त्यांचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंकज त्रिपाठी हे अशा बॉलीवूड स्टार्सपैकी एक आहेत ज्यांना कोणत्याही स्टारडममध्ये रस नाही. पण एक काळ असा होता की त्यांना कोणी ओळखत नव्हते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला होता.
पंकज त्रिपाठी यांच्या 'मिर्झापूर' (mirzapur) या वेब सीरिजने ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दमदार कथेमुळे खळबळ उडवून दिली होती. ही वेब सिरीज रिलीज झाल्यापासून सर्वत्र तिची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे 'मिर्झापूर'मधील कालिन भैय्या (पंकज त्रिपाठी) व्यतिरिक्त बीना त्रिपाठी ही व्यक्तिरेखा लोकांमध्ये खूप लोकप्रिय होती.
बिना त्रिपाठी (bina tripathi) यांनी त्यांचे ऑन-स्क्रीन पती कालिन भैय्या (kaleen bhaiya) यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. बीना त्रिपाठी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये बीना त्रिपाठी यांची भूमिका रसिका दुग्गल (Rasika Dugal) यांनी साकारली आहे. रसिका यांनीन पंकज त्रिपाठी यांच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केले आहेत जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या चित्रांमध्ये बीना आणि कालीन भैया यांच्या 'मिर्झापूर' वेब सीरिजचा फोटोही आहे.
रसिका दुग्गल यांनी पंकज त्रिपाठींसोबतचा फोटो शेअर करत 'वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पंकज त्रिपाठी. तुझ्याशी बोलण्यासाठी अजून बरेच सीजन्स आहेत. (जे तुम्ही खूप मनोरंजक बनवता... लवकरच भेटू.)' असे म्हटलं आहे.
रसिका दुग्गल म्हणजेच बिना त्रिपाठींचे हे कॅप्शन पाहून कालिन भैय्या स्वतःला रोखू शकले नाहीत. कालिन भैय्याने कॅप्शनमध्ये 'लवकरच भेटू रसिका,' असे म्हटलं आहे.
सध्या 'मिर्झापूर' वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग सुरू झाले आहे. याबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.