Rasika Sunil : पडद्यावर आधी किसिंग सीन म्हटलं की सगळ्यांना कसं तरी वाटायचं पण आता पडद्यावर किसिंग सीन देणे, ही आता फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. कलाकारही सिनेमाचा भाग म्हणून असे सीन करण्यास तयार होतात. परंतु 'हे' असं करण्यासाठी सगळेच कलाकार कम्फर्टटेबल असतात, असे नाही. असाच एक किस्सा 'फकाट'च्या चित्रीकरणादरम्यान सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनीलसोबत घडला. चित्रपटात सुयोगला रसिकाला किस करायचे होते. मात्र, असा सीन करण्याकरता तो खूप अनकम्फर्टटेबल झाला होता. हा सीन करणे सुयोगला खूपच अवघड जात होते, कारण यापूर्वी त्याने किसिंग सीन कधीच केला नव्हता. मात्र या सगळ्यात त्याला त्याचीच सहकलाकार रसिका सुनीलने साथ दिली आणि अखेर तो सीन चित्रित झाला. हा सीन कसा चित्रित झाला याचा किस्सा रसिकानेच आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. येत्या 2 जूनला रसिका आणि सुयोगमधील हा रोमान्स पडद्यावर पाहायला मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या सीनबद्दल रसिका सुनील म्हणते, 'असा सीन करायचा आहे हे जेव्हा सुयोगला कळले, तेव्हा तो खूप घाबरला कारण आधी त्याने असा सीन कधीच दिला नव्हता. मी हा सीन करण्यासाठी  कम्फर्टटेबल होते. मला काहीच अडचण नव्हती. पण सुयोगला हे जरा विचित्र वाटत होतं. त्याला मी सांगितलं आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि कामाच्या बाबतीत प्रोफेशनलही आहोत, त्यामुळे हा सीन करायला तुला एवढं अनकम्फर्टटेबल व्हायची गरजच नाही. तेव्हा आमच्या दोघांचं लग्नही झालं नव्हतं. तरीही त्याला हे करायला खूप दडपण येत होतं. अखेर मी आणि दिग्दर्शक श्रेयश जाधवने भरपूर समजवल्यानंतर किसिंग सीन देण्यासाठी तो  तयार झालो आणि हा सीन चित्रित झाला. आता आमच्या दोघांचंही लग्न झालं आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं तू किसिंग सीन दिलास तुझा नवरा तुला काही बोलला नाही. त्यावर मी एकच सांगेन, माझं क्षेत्र काय आहे, हे माझ्या नवऱ्याला माहित आहे. त्यामुळे इथे भूमिकेची गरज म्हणून हे सगळं करावं लागतं. याची त्याला पूर्ण कल्पना आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



हेही वाचा : 'माझं अनेकदा लग्न अन् दोन मुलं...', 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्री Jui Gadkari ची पोस्ट चर्चेत


वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित 'फकाट' या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका असून हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे