मुंबई : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि रसिका सुनिल यांचं फारसं चर्चेत न आलेलं नातं आता संपुष्टात आलंय. इतकंच नाही तर आता सिद्धार्थच्या 'नव्या प्रेमाची' चर्चा आता सुरू झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनाया म्हणजेच रसिका सुनिल आणि सिद्धार्थची ऑफस्क्रिन केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. सोशल मीडियावरही या दोघांचे फोटो पाहायला मिळाले. प्रेक्षकांनाही सिद्धार्थ - रसिकाची जोडी आवडली होती. 

पण, अचानक काय झालं कुणास ठावूक? दोघं एकमेकांसोबत दिसेनासे झाले... आणि त्यांचं नातं संपुष्टात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या. 


या चर्चा खऱ्या ठरल्या जेव्हा सिद्धार्थचं 'नवं प्रेम' सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं. सिद्धार्थ सध्या 'उर्फी' फेम मिताली मयेकरसोबत नात्यात असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर हे दोघं एकत्र दिसत आहेत. 



आता या चर्चा खऱ्या किती? आणि खोट्या किती हे रसिका, सिद्धार्थ किंवा मितालीच सांगू शकतात. पण, प्रेक्षक मात्र बॉलिवूडचा लव्ह, ब्रेक-अपचा ट्रेन्ड मराठीतही दिसू लागल्यानं भांबावून गेलेत.