रात्रीस खेळ चाले फेम काशी दिसणार नवीन भूमिकेत, लहान मुलांसाठी खास मेजवाणी
तो हिंदी आणि मराठी भाषेत बालनाट्य घेऊन येत आहे.
मुंबई : रात्रीस खेळ चाले ही मालिका घराघरात पोहोचली. आणि या मालिकेसोबतच त्यातील पात्रांनी देखील भरपूर प्रसिद्धी मिळवली. आज या कलाकारांचं मोठं फॅन फॉलोविंग निर्माण झालं आहे.
त्यात या मालिकेच्या दुसऱ्या भागातील एक पात्र अद्याप प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे ते म्हणजे काशी...
अभिनेता सचिन शिर्के याने काशीचं पात्र साकारलं होतं. आता तो लहानमुलांसाठी खाज मनोरंजनाची मेजवाणी घेऊन येत आहे. तो हिंदी आणि मराठी भाषेत बालनाट्य घेऊन येत आहे.
चार यार पक्के या बालनाट्यांचा प्रयोग 13 मार्च 2022 मध्ये गोदरेज डान्स थिएटर येथे पार पडणार आहे.
काशी आज नव्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येतो आहे. काशीसोबतच काही इतर मालिकांमधील कलाकार देखील या नाटकात मुख्य भूमिका साकारणार आहेत.
पंकज शर्मा, मृणालिनी जावळे यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. तर स्वत: काशी आणि पंकज शर्मा या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत.
सचिन झाडाच्या भूमिकेत दिसणार आहे. सचिन सह डॉ निखिल राजेशिर्के, शितल क्षीरसागर देखील नाटकात धम्माल पात्र साकारणार आहेत.