Raveena Tandon Controversy: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा रवीना ही वेगवेगळ्या गोष्टींवर तिचं स्पष्ट मत मांडताना दिसते. यावेळी रवीनानं मध्ये प्रदेशच्या सातपुडा व्याघ्र (Satpura Tiger Reserve) प्रकल्पाबाबात तिच्या नावावरून बराच वाद झाला. रवीनानं या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, आता वाघाचा जवळून फोटो आणि व्हिडीओ काढल्यानं रवीना सोशल मीडियावर ट्रोल होत असून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या वादामुळे रवीना अडचणीत आली होती. तर, इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडनने या संपूर्ण प्रकरणाबाबत खुलासा केला आहे.  'त्या सर्व स्टोरीज या चुकीच्या होत्या, एक स्टोरी आली आणि मग त्यानंतर एकामागे एक सगळ्या छापण्यात आल्या. त्याचं काही होणार नाही. त्यापेक्षा आता मध्य प्रदेश सरकारकडून मला वन्यजीवांचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा प्रस्ताव आला असून त्यांनी याप्रकरणी माझी माफीही मागितली आहे. त्यामुळे कुठलाही वाद निर्माण झाला नाही', असे रवीना म्हणाली.



काय आहे सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचा वाद 


काही दिवसांपूर्वी रवीना टंडन तिच्या कुटुंबासह मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात सफारीला गेली होती. यादरम्यान रवीनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये रवीना वाघाच्या जवळून फोटोग्राफी करताना दिसत होती. अशा परिस्थितीत व्याघ्र संवर्धन मार्गावर कार घेऊन वाघाचे जवळून फोटो काढल्यानं वाद निर्माण झाला कारण वाघ हा आपल्या देशातील अशा काही प्राण्यांपैकी एक आहे ज्यांची संख्या कमी राहिली आहे. अशा स्थितीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर आक्षेप घेतला होता.



रवीना ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिनं शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे ती बऱ्याचवेळा ट्रोल होत असते. या आधी रवीना ही मेट्रोकार शेटमुळे जंगलाचे नुकसान होत आहे म्हणत त्याच्या विरोधात होती. त्या वक्तव्यावरून रवीनाला सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु होती. काही सोशल मीडिया नेटकऱ्यांनी रवीना आणि दिया मिर्झाला टॅग करत विचारले की उच्चभ्रूंना मध्यमवर्गीय मुंबईकरांचा संघर्ष माहित आहे का?


हेही वाचा : ''नागराज मंजूळेही...'' मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर Tejaswini Pandit चं रोखठोक मतं


नेटकऱ्याच्या प्रश्नावर रवीनानं सडेतोड उत्तर दिलं आहे. रवीना म्हणाली, '1991 पर्यंत मी देखील लोकलनं प्रवास केला आहे. लोकलनं प्रवास करताना तुमच्या सारख्या नाव नसलेल्या ट्रोलर्सनं माझा शारीरिक छळ केला. यश मिळाल्यानंतर मी कार खरेदी केली. (raveena tandon on satpura tiger reserve controversy)