मुंबई : KGF Chapter 2 या चित्रपटातील अभिनयासाठी रवीना टंडनचं खूप कौतुक होत आहे. रवीना टंडनने 1991 मध्ये आलेल्या 'पत्थर के फूल' या चित्रपटातून इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात केली होती. रवीनाचा इंडस्ट्रीतील प्रवास खूप मोठा आहे. तिने मोहरा, लाडला, दिलवाले आणि अंदाज अपना अपना सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की ही रवीना टंडन एकेकाळी स्टुडिओच्या फ्लोअर्सवर लोकांच्या उलट्या साफ करायची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवीना स्टुडिओची फरशा पुसायची
एका मुलाखतीमध्ये बोलताना रवीना टंडन म्हणाली, 'हे खरं आहे. लोकांच्या उलट्या साफ करण्यासाठी स्टुडिओच्या मजल्यावरच्या फरश्या पुसणं यासारख्या गोष्टींपासून मी सुरुवात केली. मी बहुधा प्रल्हाद कक्करला दहावीच्या वर्गात असिस्ट केलं होतं. तेव्हा तो मला सांगायचा की तू पडद्यामागे काय करतेस, तू पडद्यासमोर यायला हवं, तूझी पात्रता ती आहे.


कशी आली मॉडलिंग करण्याची आइडिया?
रवीना टंडन म्हणाली, 'तेव्हा मी त्याला नकार द्यायचे. आणि म्हणायचे नाही कधी अभिनेत्री नाही. तरी देखील मी या सगळ्यात योगायोगाने आले आहे. मी अभिनेत्री होईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. रवीना टंडनने अभिनयापूर्वी मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरुवात कशी केली हे देखील सांगितलं. रवीना म्हणाली, जेव्हा एखादी मॉडेल प्रल्हाद सरांच्या सेटवर पोहोचू शकत नाही तेव्हा ते म्हणायचे, रवीनाला कॉल करा.


ना डान्स माहीत होता ना अभिनय, सगळं स्वतः शिकले
तो मला मेकअप करून पोज द्यायला सांगायचा. तेव्हा मी विचार केला की जर मला हेच करायचं असेल तर मी प्रल्हादसाठी फुकटात पुन्हा पुन्हा तेच का करत आहे. त्यातून काही पैसे का मिळत नाहीत? या कल्पनेनेच मी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. मग मला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि मला ना अभिनय कळत होता, ना डान्स, ना डायलॉग्स बोलता येत होते. मी हळूहळू सगळंकाही शिकले.