मुंबई : 'मोहरा', 'लाडला', 'दिलवाले', 'अंदाज अपना अपना' यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये रवीना तिच्या नातवासोबत खेळताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हीडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. नातावासोबत रवीना फार खूश दिसत आहे. तिच्याया व्हीडिओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवीना 2019 साली आजी झाली.  व्हीडिओमधील मुलगा रवीनाची दत्तक मुलगी छायाचा आहे. 1994 मध्ये रवीनाने दोन मुली दत्तक घेतल्या. छाया आणि पूजा असं तिने दत्तक घेतलेल्या मुलीचं नाव आहे. रवीनाने दोन्ही मुलींचे पालकत्व सांभाळलं आहे. त्यामुळे रवीनाचं कौतुक देखील केलं जात आहे. 


त्यानंतर 22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानीसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे. त्यांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे.