मुंबई : नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) अनेकदा चर्चेत असते. आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रवीनानं 1991 साली प्रदर्शित झालेल्या 'पत्थर के फूल' या चित्रपटाद्वारे तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. 90 च्या दशकात अशी अनेक हिट कपल्स होते, ज्यांनी चित्रपटाच्या पडद्यासोबतच लोकांच्या मनावर राज्य केले. यापैकी एक जोडी होती अजय देवगण (Ajay Devgn)आणि रवीना टंडन यांची. 'दिलवाले' चित्रपटातील अजय देवगण आणि रवीना टंडनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अजय देवगणचे अफेअर अनेक अभिनेत्रींसोबत असल्याचे म्हटले जात होते. मात्र रवीनासोबतच्या रिलेशनशिप आणि भांडणानं एकच खळबळ उडाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय आणि रवीनाचा 'दिलवाले' हा चित्रपट त्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे आणि या चित्रपटात काम करताना दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली. मात्र, यादरम्यान अजय आणि करिश्माचेही नावे जोडले जात होते. अजय आणि करिश्मानं त्या काळात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असून रवीनाला हे पटत नव्हतं. त्यानंतर तिनं मीडियासमोर जाहीर केलं की, ती अजयसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अजयनं करिश्मा कपूरसाठी रवीनाला अनेक चित्रपटांमधून बाहेर काढल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या.



अजय पुढे म्हणाला की, 'ती माझी बहीण नीलमची मैत्रिण असल्याने ती आमच्या घरी यायची. जेव्हा तिनं गैरवर्तन सुरू केले तेव्हा आम्ही तिला घरातून बाहेर काढू शकलो नाही. तुम्ही सांगा काढू शकत होतो का? मी कधीच तिच्या जवळ गेलो नाही. मी तिला कधी फोन केला किंवा तिच्याशी स्वत: हून बोललो ते तिला विचारा, ती फक्त तिच्यासोबत माझं नाव जोडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, तिने केलेला आत्महत्येचा प्रयत्न हा देखील एक पब्लिसिटी स्टंट होता.'


अजयने रवीना टंडनसोबत कोणतेही नातं असल्याचे नाकारले.  अजयला जेव्हा विचारण्यात आले की 'तुमच्या दोघांमध्ये काय चालले आहे? तुम्ही एकमेकांना माफ करून पुढे का जात नाही? तेव्हा अजयने उत्तर दिले की, 'सॉरी? तुम्ही  विनोद करत आहात का? सगळ्यांना माहित आहे की लहानपणापासून खोटं बोलत आली आहे. म्हणूनच तिच्या मूर्खपणाच्या बोलण्यावर मला काही वाटत नाही, पण यावेळी तिनं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिला सल्ला देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आता या मुलीनं तातडीनं मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन तिच्या मेंदूवर उपचार करावेत. नाहीतर एक दिवस ती मानसिक रुग्णालयात पोहोचेल, मी तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाण्यास तयार आहे.'