मुंबई : 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यातून पाण्यावर आग लावणारी अभिनत्री आज 26 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. रवीना 44 वर्षांची आहे. रविना यशस्वी अभिनेत्री होण्याबरोबरच एक यशस्वी मॉडेल आणि प्रोड्युसर देखील आहे. रवीनाला बॉलिवूडमध्ये 27 वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षानंतरही तिचा चार्म कायम राहिला आहे. रवीनाचे सिनेमे जितके चर्चेत आहेत तितकंच तिचं अक्षय कुमारसोबत असलेलं अफेअर देखील. तर आज बघूया रवीना आणि अक्षयची लव्हस्टोरी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक वेळ अशी होती जेव्हा रवीना टंडनचं हृदय फक्त अक्षयसाठी धडकत असे. असं म्हटलं जातं की, या दोघांच्या प्रेमाची सुरूवात 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहरा'च्या दरम्यान झाली. हा सिनेमा तर सुपरहिट ठरलाच पण या दोघांची केमिस्ट्री देखील खूप पसंत आली. याचमुळे या दोघांमध्ये जवळीक वाढली. 


यानंतर हे दोघं अनेकदा एकत्र दिसले. एवढंच काय तर या दोघांच लग्न कधीही होऊ शकतं अशी चर्चा देखील रंगली. तसेच असं देखील म्हटलं जातं की, रवीनाने त्यावेळी सिनेमे देखील साइन करणे बंद केले. याचं कारण त्यावेळी अक्षय कुमार असल्याचं सांगण्यात आलं. अक्षयला असं वाटतं होतं की, रवीनाने हाऊस वाइफ असावं. 


1999 साली रवीनाने दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, अक्षयने सिनेमाचं शुटिंग संपताच लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच अक्षय - रवीनाने मंदिरात गुपचुप साखरपुडा देखील केला होता. रवीनाने सांगितलं की, अक्षयला भिती होती की, साखरपुड्याची बातमी बाहेर आल्यावर त्याचा परिणाम करिअरवर होईल. 


मात्र नंतर अशी माहिती आली की, अक्षय रवीनासोबतच शिल्पा शेट्टीला देखील डेट करत आहे. याचमुशे रवीना खूप टेन्शनमध्ये आली आणि तिने अक्षयसोबतच नातं थांबवलं. यानंतर रवीनाने अनिल थडानीसोबत लग्न केलं. अनिल थडानी यांची रवीना ही दुसरी पत्नी आहे. यांनी राजस्थानमध्ये 22 फेब्रुवारी 2004 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या अगोदर रवीनाने 2 मुलींना दत्तक घेतलं होतं. यांची नावे पूजा आणि छाया आहेत. त्यानंतर रवीना आणि अनिलला 2 मुलगे आहेत ज्यांच नाव रशा आणि रणबीर.