मुंबई : बॉलिवूडच्या झगमगत्या विश्वात अनेक प्रसिद्ध कलाकारांनी मोठ्या संकटांना तोंड दिलं आहे. 90 च्या दशकात कलाविश्वात अभिनेत्रींना काम करणं मोठं जिकरीचं होतं. आता तेव्हाच्या काही घटना हळूहळू सर्वांसमोर येत आहेत. अभिनेत्री रविना टंडने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती म्हणाली तेव्हा महिला पत्रकार माझ्याबद्दल नकारात्मक स्टोरी लिहियाच्या. अशा अनेक महिला पत्रकारांची माझ्यावर दया असल्याचं रविनाने एका मुलाखतीत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविना म्हणते, 'स्टोरी प्रसिद्ध झाल्यानंतर पत्रकार कायम माफी मागयचे आणि दुर्लक्ष करायचे. नव्वदच्या दशकातील महिला संपादक बॉडी शेमिंग आणि अपमानित करायचे. माझ्यावर अनेक हल्ले करण्यात आले, असं देखील रविना म्हणाली. एवढंच नाही तर पुरुष कलाकारांना खूश करण्यासाठी त्या महिला कलाकारांचा अपमान करायची. 


यावेळी रविना यांनी सोशल मीडियाचे आभार मानले. कारण याठिकाणी आता सर्व कलाकारांना त्यांच्या चाहत्यांसोबत थेट संपर्क साधता येतो. 90च्या दशकात असं  करता येत नव्हतं. एका मुलाखतीत रविनाने आपल्या भावना व्यक्त केल्या. 


रवीना टंडन लवकरच अरण्यक वेब सीरिजमधून पदार्पण करणार आहे. ही एक क्राईम थ्रिलर सीरिज आहे. सीरिज 10 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये रविना एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.