मुंबई : गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) वगळण्यात आलेल्या रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाचा टिझर आऊट झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी जाधव यांनी आपल्या फेसबुक वॉलवर या सिनेमाचा टिझर पोस्ट केला आहे. रवी जाधव यांनी या टिझरसोबत आपली खंत व्यक्त केली आहे. सिनेमावरून जो वाद होतोय तो दुर्दैवी आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच त्यांनी हा सिनेमा अगदी मनापासून केला आहे त्यामुळे प्रेक्षकांना आवडल्यास टिझर शेअर करा असं सांगण्यात आलं आहे. 


‘झी स्टुडिओज’ आणि मेघना जाधव यांची निर्मिती आणि रवी जाधवचे दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये बऱ्याच गोष्टी लक्ष वेधत आहेत. या सिनेमातून न्यूड मॉडेलच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आले आहे. आपल्याला माहितच आहे रवी जाधवने आतापर्यंत अनोख्या विषयांना प्रेक्षकांसमोर आपल्या हटके मांडणीतून मांडले आहे. हा सिनेमा देखील अगदी तसाच आहे. हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमाला इफ्फीतून वगळण्यात आल्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला. 



सिनेमातील या टिझरमध्ये नसरुद्दीन शहा यांच्या तोंडी एक वाक्य आहे जे आपल्याला या विषयाचा प्रकर्षाने विचार करायला लावतं. ते म्हणजे, ‘बेटा…. कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही’, हे वाक्य काळजाला भिडते. हा सिनेमा सुरूवातीपासूनच चर्चेत असल्यामुळे उत्सुकता आणखी वाढली आहे.