मुंबई : दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'न्यूड' या सिनेमाने सर्व संकट पार केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेन्सॉर बोर्डाकडून कोणताही सिन कट न करता या सिनेमाला अ प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे आता न्यूड या सिनेमामागील सर्व संकट दूर झाली आहेत. आता  न्यूड चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.



रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. तसेच या मुद्द्यावरून सेंसॉर बोर्ड आणि सरकारवर जोरदा टीकाही झाली होती.  तेरा ज्युरी मेबर्सनी एकुण 24 सिनेमांची इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड केली होती. पॅनारोम विभागात न्यूड सिनेमाचं स्क्रीनिंग होणार होतं. पण माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या सिनेमाला वगळण्यात आले.  सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत या सिनेमाला यादीतून वगळल्याची माहिती समोर आली होती. 


मात्र आता हा सिनेमा कोणतीही कात्री न लावता प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या मेंबर असलेल्या अभिनेत्री विद्या बालन यांनी या सिनेमाला स्टँडींग ओवेशन दिले आहे. त्यामुळे आता हा सिनेमा कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्रदर्शित होणार आहे.