मुंबई : गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांचे रूप पालटले आहे. चौकट मोडून अगदी वेगळ्या विषयांवर चित्रपट बनत आहेत. अशात अजून एका चित्रपटाची भर पडली आहे. ती म्हणजे दिग्दर्शक रवी जाधव 'न्यूड' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाचे पोस्टर रवी जाधव यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केले आहे. चित्रपटाचे नाव आणि पोस्टर यात तफावत असल्याने कथानकाचा अंदाज लावता येत नाही. पोस्टरमध्ये एक महिला आरतीचे ताट घेऊन उभी पाहायला मिळते.  ‘न्यूड’ हे नावही या पोस्टकरवर तितक्याच कलात्मकतेने साकारण्यात आले आहे. चित्रात रंग भरण्यासाठी उपयोगी पडणारा ब्रश आणि ‘स्त्री’ या दोन गोष्टी या नावात अधोरेखित करण्यात आल्या आहेत.



रवीने त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आपले विवस्त्र शरीर आणि आत्मा सर्वांसमोर आणणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील त्या प्रत्येक न्यूड मॉडेलसाठी हा चित्रपट समर्पित आहे." चित्रपटगृहात ‘फास्टर फेणे’ चित्रपटासोबत ‘न्यूड’चा टीझरदेखील पाहाता येणार असल्याचा खुलासा त्याने केला आहे.