Anushka Sharma Viral Video: विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का प्रत्येक सामन्याला उपस्थित असते. नुकताच झालेला राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी सामना पाहण्यासाठी ती नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित असतानाचे व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल झाले. (IPL 2024 ) आयपीएचे सामने शेवटच्या टप्प्यात आले असून विजयाची ट्रॉफी कोणता संघ घेऊन जाणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.  आरसीबी विरुद्धचा राजस्थान रॉयल्सचा सामना पार पडला असून या सामन्यात (RR VS RCB ) आरसीबीचा पराभव झाल्याने अंतिम फेरीत जाण्याची संधी विराटच्या संघाने गमावली. राजस्थान विरुद्धचा आरसीबीचा सामना सामना पाहण्यासाठी अनुष्का देखील उपस्थित होती. 




आरसीबीसाठी हा सामना खुपच महत्त्वाचा होता. रॉयल राजस्थानच्या विरुद्ध (RR VS RCB )  सामन्यात रॉयल चॅलेंजेस बंगळुरु हा धमाकेदार कामगिरी करणार असं आरसीबीच्या चाहत्यांना वाटत होतं. सामन्या दरम्यान विराट येताच चाहत्यांनी त्याला चिअरअप केलं. मात्र अंतिम फेरी पर्यंत पोहोचत असाताना आरसीबीला हार पत्करावी लागली. थोडक्यातच आरसीबीचा पराभव झाल्याने कॅप्टन विराटसह संघातील प्रत्येकासाठी हा सामना अविश्वसनीय होता. विराटचा संघ अंतिम फेरी पोहचू न शकल्याने आरसीबीच्या चाहत्यांची निराशा झाली.मात्र असं असलं तरी या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये असलेल्या अनुष्काचे फोटो आणि व्हिडीओ सोशलमीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.त्याशिवाय अनुष्का चिंतेत असताना तिचा फोटो जाोरदार व्हायरल होत आहे. हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या अनुष्काचा कॅज्युअल शर्ट आणि डेनिम पॅन्ट असा साधा लुक होता. सामन्याविषयी तिच्या मैत्रिणीशी बोलताना तिचा चेहरा खूपच गंभीर होता.   


 


निवृत्तीवर काय म्हणाला विराट ? 
नुकत्याच एका मुलाखतीत त्याला त्याच्या निवृत्तीबद्दल विचारलं होतं. त्यावेळी विराट म्हणाला की,  एक दिवस मी संघाला नक्कीच विजय मिळवून देईल. मी माझे प्रयत्न सोडणार नाही. त्याशिवाय मी माझ्या खेळाशी पूर्णपणे प्रामाणिक आहे. मी खेळातून निवृत्त होण्याआधी आरबी विजयाची ट्रॉफी नक्की मिळवणार असं विराटने मुलाखतीत सांगीतलं. त्याच्या या विधानावर चाहत्यांनी 'तू हे नक्की करून दाखवशील' असा विश्वास व्यक्त केला आहे. (RR VS RCB ) आरसीबीच्या चाहत्यांसाठी हा पराभव स्विकारणं कठीण जात असलं तरी विराटच्या कर्णधआर पदावर पुर्णपणे विश्वास असल्याचं सोशलमीडियावर सांगितलं जातं आहे. आरसीबीचा पराभव करत राजस्थान रॉयल्सने अंतिम फेरीत बाजी मारली. त्यामुळे यंदाच्या या आयपीएलच्या रणसंग्रामात कोणता संघ विजयाची ट्रॉफी पटकावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.