R.D Burman's 84th Birth Anniversary : बॉलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार आरडी बर्मन (RD Burman birthday) यांची आज (27 जून 2023) 84 वी जयंती आहे. 1939 मध्ये आजच्या दिवशी आरडी बर्मन यांचा जन्म कोलकाता येथील संगीतकाराच्या घरी झाला. आरडी बर्मन यांचे वडील सचिन देब बर्मन देखील चित्रपटांसाठी गाणी तयार करायचे. आरडी बर्मन यांनी आईच्या पोटातच संगीताचे शिक्षण घेतले होते असे म्हणायला काही हरकत नाही. आर.डी.बर्मन यांचे आयुष्य जितके रंजक होते, तितकीच त्यांची प्रेमकथाही रंजक होती. आपल्या बहारदार संगीताने रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारे पंचम दा स्वत:चं ह्रदय मात्र लोकप्रिय गायिका आशा भोसल यांना देऊन बसले होते. 


अन् अखेर प्रेमाचा विजय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरडी बर्मन (RD Burman) हे देशातील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी केवळ संगीताच्या दुनियेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली नाही, तर किशोर कुमार आणि आशा भोसले यांना सुपरस्टार गायक बनवले. पंचम दा हे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आशा ताईंचेही पंचम दा यांच्यावर प्रेम होते, पण तरीही त्यांनी लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर अनेक वर्ष होकार-नकारचा खेळ सुरु राहिला अन् अखेर प्रेमाचा विजय होत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.   


...ही जोडी संगीत क्षेत्रात सुपरहिट


आरडी बर्मन यांचे पहिले लग्न रिटा पटेलसोबत झाले होते. पण, काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. याचदरम्यान आरडी बर्मन संगीत क्षेत्रात प्रचंड सक्रिय होते. तर दुसरीकडे, आशा भोसले यांचे पती गणपतराव भोसले यांचे 1966 मध्ये निधन झाले. त्यामुळे आशा भोसलेही एकट्या पडल्या होत्या. आशा भोसले आणि आरडी बर्मन या दोघींनीही आपले आयुष्य एकट्याने जगात होते. 1970 मध्ये आशा भोसले आणि आरडी बर्मा कामासाठी भेटले. आशा भोसले यांची अनेक दमदार गाण्यांना आरडी बर्मन यांनी संगीत दिले होते. या जोडीच्या 'पिया तू अब तो आजा' आणि 'दम मारो दम' सारख्या गाण्यांनाही पुरस्कार मिळाला. हळूहळू आशा भोसले आणि आरडी बर्मन ही जोडी संगीत क्षेत्रात सुपरहिट ठरु लागती. 


याच दरम्यान आरडी बर्मन (RD Burman birthday) यांनी आशा भोसले यांना लग्नासाठी विचारणा केली. मात्र आशा भोसले यांनी त्यांचा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला. आरडी बर्मन हे आशा भोसले यांच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान होते. पण, त्यांच्या प्रेमात वयाचं बंधन कधीच आले नाही. त्याच काळात आशा भोसले यांचे पती गणपतराव भोसले यांच्या निधनाच्या दुखातून त्या सावरल्या नव्हत्या. त्यामुळे त्या आरडी बर्मन यांना नकार देत होत्या. पण, आशा भोसले यांच्याकडून आरडी बर्मन यांना काही करुन होकार मिळावयाचा होता. यात त्यांना लता मंगेशकर यांची देखील मदत मिळाली. 


अखेर दोघांनी 1980 मध्ये लग्न केले. आशा भोसले यांनी वयाच्या 47 व्या वर्षी आरडी बर्मन यांच्याशी विवाह केला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे पंचम दा आणि आशा भोसले जीवनसाथी झाले. मात्र, त्यांचा हा प्रवास खूपच छोटा होते. पंचम दा यांचे 4 जानेवारी 1994 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि ते आशा ताईंपासून कायमचे दूर झाले.